गौण खनिजाचे रक्षण करणे बेततेय जिवावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 02:55 PM2020-01-18T14:55:47+5:302020-01-18T14:55:58+5:30

जिल्हाधिकारी डॉ. सुमन चंद्रा यांच्या मार्गदर्शनात अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांनी गौण खनिजाचे रक्षण करण्यासाठी नियोजनबद्ध कारवाया सुरु केल्या आहेत.

Protecting Secondary Minerals prove Deadly for employees | गौण खनिजाचे रक्षण करणे बेततेय जिवावर!

गौण खनिजाचे रक्षण करणे बेततेय जिवावर!

Next

- योगेश फरपट 
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: बुलडाणा जिल्हयात गौण खनिज उत्खनन करण्यास मनाई आहे. असे असतानाही रात्रीच्या वेळी सर्रासपणे गौण खनिज चोरीच्या घटना घडत आहेत. हा प्रकार रोखण्यासाठी महसूल प्रशासनाने पुढाकार घेतला असला तरी मोटारसायकलवर गौण खनिज चोरी रोखणे अशक्य ठरत आहे. महसूल कर्मचाऱ्यांच्या अंगावर वाहन नेवून, कधी मारहाण करून कर्मचाऱ्यांचे मनोबल कमी करण्याचा प्रयत्न गौण खनिज चोर्ट्याकडून होत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ९ घटनात कर्मचाºयांनी पोलिसात तक्रार दाखल केल्याची माहिती आहे.
महसूल, पोलिस विभागाचे संयुक्त पथक कार्यान्वीत करून यादृष्टीने नियोजन करणे गरजेचे आहे. तेव्हाच गौण खनिज चोरीला आळा बसू शकेल. जिल्हयातील एकही रेती घाटाचा अद्याप लिलाव झालेला नसल्याची माहिती जिल्हा खनिकर्म विभागाकडून मिळाली आहे. असे असतांनाही जिल्ह्यातील पुर्णा, ज्ञानगंगा, विश्वगंगा, मन, वान, नळगंगा, सिद्धगंगा या नदीपात्रातून दिवस अन रात्र टिप्पर, ट्रॅक्टरच्या सहाय्याने गौण खनिजाची चोरी करून अवैध वाहतूक केली जात आहे. दिवसा नदीमधून रेतीचे उत्खनन करण्यात येत आहे. रेती माफिया ट्रॅक्टर, टिप्परने अवैधरित्या रेतीची वाहतूक करीत आहेत. यामुळे शासनाचा लाखो रूपयांचा महसूल बुडत आहे. जिल्हाधिकारी डॉ. सुमन चंद्रा यांच्या मार्गदर्शनात अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांनी गौण खनिजाचे रक्षण करण्यासाठी नियोजनबद्ध कारवाया सुरु केल्या आहेत. उपविभागीय अधिकारी व तहसिलदाराकडूनही कारवाईसाठी पुढाकार घेतला जात आहे. जिल्हयात शेगाव, खामगाव, मलकापूर, चिखली, सिंदखेडराजा याठिकाणी महसूल प्रशासनाने कारवाया करीत गौण खनिज माफीयांना धडा शिकवला आहे. मात्र हे सर्व करीत असताना मंडळ अधिकाºयांसह तलाठ्यांना जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावावे लागत आहे. काही ठिकाणी तहसिल कार्यालयाकडे तहसिलदारांचे एकमेव शासकीय वाहन आहे. उपलब्ध त्या वाहनाने कर्मचाºयांना कारवाईसाठी निघावे लागते. काही महिन्यापूर्वी गौण खनिज माफियांनी खुद्ध अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांनाही टार्गेट बनवण्याचा प्रयत्न केला होता. तर जलंब येथे गुरुवारी रात्री मंडळ अधिकाºयाला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला.

गुन्हा दाखल करण्यास पोलिसांकडून विलंब

माटरगाव येथील मंडल अधिकारी संजय बापुराव देशमुख हे गौण खनिजाचे रक्षण करण्यासाठी ड्युटीवर असताना त्यांना अवैधरित्या रेतीची वाहतूक करताना टिप्पर गाडी दिसली. टिप्पर चालकाला त्यांनी हात देवून थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्या टिप्पर चालकाने तहसिल कार्यालयाचे गाडीला अपघात घडवून मंडळ अधिकाºयाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. परंतु गाडीचे वाहन चालक संतोष सातभाकरेंनी समयसुचकता व प्रसंग सावधानता ठेवत गाडी ही रस्त्याचे बाजुला काढून घेतली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.याबाबतची तक्रार मंडल अधिकारी संजय देशमुख यांनी मध्यरात्री जलंब पोलीस स्टेशनला दिली. परंतु वृत्त लिहेपर्यंत पोलिसांनी गुन्हा दाखल केला नव्हता. तर सदर टिप्पर वाहन चालक हा माटरगाव येथील असल्याचे समजते. उल्लेखनीय बाब म्हणजे घडलेल्या घटनेची तक्रारही मंडल अधिकारी यांनी मध्यरात्रीच जलंब पोलीस स्टेशनला दिली होती. परंतु दुसºया दिवशी सायंकाळी ६ वाजेपर्यंत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला नव्हता.


मंडळ अधिकाºयाला जीवे मारण्याचा प्रयत्न
जलंब : अवैधरित्या मध्यरात्री रेतीची वाहतूक करणाºया टिप्पर चालकाला हात देवून तहसीलच्या गाडीतील मंडळ अधिकाºयाने थांबविण्याचा प्रयत्न केला असता टिप्पर चालकाने मंडळ अधिकाºयाच्या अंगावर गाडी आणुन जीवे मारण्याचा प्रयत्न मध्यरात्री मोरगाव डिग्रस गावानजीक घडली. या घडलेल्या घटनेमुळे अधिकारी वर्गात एकाच खळबळ उडाली.


गौण खनिज चोरी रोखण्यासाठी आमचे अधिकारी व कर्मचारी जिवाचे रान करीत आहेत. प्रसंगी जीव धोक्यात घालून कारवाया करीत आहेत. उपविभागीय अधिकारी व तहसिलदारांनी त्यांच्यास्तरावर नियोजन केले आहे.
- प्रमोदसिंह दुबे, अप्पर जिल्हाधिकारी, बुलडाणा

 

Web Title: Protecting Secondary Minerals prove Deadly for employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.