वन्य प्राण्यांचे संरक्षण; काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 12:23 AM2017-10-04T00:23:56+5:302017-10-04T00:24:23+5:30

बुलडाणा: वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ या कायद्याची   अंमलबजावणी होत नसल्याने वन्य प्राण्यांचे संरक्षण धोक्यात  आले आहे. वन्य प्राण्यांचे संरक्षण, करण्यासंबंधी सामान्य  नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची गरज निर्माण झाली  आहे. जागतिक प्राणी दिनाच्या पृष्ठभूमीवर वन्यजीव सप्ताहच्या  माध्यमातून वन्य प्राण्यांचे संरक्षणाची गरज सर्वसामान्यांपर्यंत  पोहचविणे महत्त्वाचे आहे. 

Protection of wild animals; Time needed | वन्य प्राण्यांचे संरक्षण; काळाची गरज

वन्य प्राण्यांचे संरक्षण; काळाची गरज

googlenewsNext
ठळक मुद्देवन्यजीव संरक्षणजागरूकता निर्माण करण्याची गरज 

बुलडाणा: वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ या कायद्याची   अंमलबजावणी होत नसल्याने वन्य प्राण्यांचे संरक्षण धोक्यात  आले आहे. वन्य प्राण्यांचे संरक्षण, करण्यासंबंधी सामान्य  नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची गरज निर्माण झाली  आहे. जागतिक प्राणी दिनाच्या पृष्ठभूमीवर वन्यजीव सप्ताहच्या  माध्यमातून वन्य प्राण्यांचे संरक्षणाची गरज सर्वसामान्यांपर्यंत  पोहचविणे महत्त्वाचे आहे. 
- जंगलात असलेल्या अन्नसाखळीमधील वाघ हा मुख्य घटक  आहे. तसेच वाघामुळे जंगलात असलेल्या वनस्पतींचे आणि इ तर तृणभक्षी प्राण्यांमध्ये समतोल राखला जातो. त्यामुळे वाघांचे  संरक्षण होणे गरजेचे आहे.
- वनसंपदेमुळे सर्व प्राणिमात्रांसाठी आवश्यक असलेला ऑ िक्सजन, मुबलक पाणी, आणि जमिनीची धूप थांबण्यासही मदत  होते. त्यामुळे जंगलांसाठी सर्व वन्यजीव वाचविणे गरजेचे आहे. 
- वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी पोषक वातावरण तयार करून,  त्यांचे प्रजनन वाढवून त्यांच्या संख्येत वाढ करणे हा प्रमुख उद्देश  समोर ठेवून वन विभागाने कार्य करावे.
- सध्या मोठमोठय़ा वनक्षेत्रांमध्ये वन्य प्राण्यांची संख्या झपाट्याने  कमी होत चालली आहे. त्यामुळे त्याच्या संवर्धनाकरिता वन्य  प्रेमींकडून प्रयत्न होणे गरजेचे आहे. 

Web Title: Protection of wild animals; Time needed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.