पत्रकारांना मारहाणीचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:39 AM2021-07-14T04:39:51+5:302021-07-14T04:39:51+5:30
धाड : जुगारावर हाेत असलेली कारवाईची बातमी घेण्यासाठी गेलल्या चांडाेळ येथील पत्रकारांना पाेलिसांनी मारहाण केली हाेती़ या ...
धाड : जुगारावर हाेत असलेली कारवाईची बातमी घेण्यासाठी गेलल्या चांडाेळ येथील पत्रकारांना पाेलिसांनी मारहाण केली हाेती़ या मारहाणीचा जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने निषेध करण्यात आला तसेच मारहाण करणारे धाड पो. ठाण्यातील पोलीस शिपाई डीगांबर कपाटे व एक अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी पाेलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात केली आहे़
बुलडाणा येथील मराठी पत्रकार संघाच्या वतीने पोलीस अधीक्षकांची भेट घेण्यात येऊन पत्रकारांना तातडीने न्याय देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी बुलढाणा मराठी पत्रकार परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र काळे, जिल्हा अध्यक्ष अरुण जैन, जिल्हा कार्याध्यक्ष चंद्रकांत बर्दे, जिल्हा सरचिटणीस नितीन सिरसाट व तालुका अध्यक्ष डॉ. विजय जट्टे, गजानन धांडे, दीपक मोरे यांच्यासह जिल्ह्यातील असंख्य पत्रकारांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात जाऊन पत्रकारांच्या एका शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदन दिले़ यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. अरविंद चावरीया यांनी पत्रकारांना उपरोक्त प्रकरणी चौकशी अहवाल मागवण्यात येऊन तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन पत्रकारांना दिले आहे.