पेट्रोल, डिझेल भाववाढीचा पेढे वाटून निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:27 AM2021-05-30T04:27:36+5:302021-05-30T04:27:36+5:30

पेट्रोल, डिझेलवर भरमसाठ कर लावून केंद्र सरकार जनतेच्या पैशांवर दरोडा टाकत असल्याचा आरोप यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला. पेट्रोल, ...

Protest against petrol, diesel price hikes | पेट्रोल, डिझेल भाववाढीचा पेढे वाटून निषेध

पेट्रोल, डिझेल भाववाढीचा पेढे वाटून निषेध

Next

पेट्रोल, डिझेलवर भरमसाठ कर लावून केंद्र सरकार जनतेच्या पैशांवर दरोडा टाकत असल्याचा आरोप यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला. पेट्रोल, डिझेलमध्ये प्रचंड दरवाढ करून केंद्रातील मोदी सरकारने जनतेचे जगणे अवघड केले आहे. या इंधन दरवाढीचा निषेध बुलडाणा शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने येथील पेट्रोल पंपसमोर वाहनधारकांना पेढे वाटून करण्यात आला. येथे कोरोनोच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करून निषेध आंदोलन करण्यात आले. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर नीचांकी पातळीवर असताना केंद्र सरकार इंधनावर भरमसाठ करवाढ करून लूट करत आहे. आज पुन्हा पेट्रोलचे भाव १०० च्या वर गेले आहेत. जनतेमध्ये या महागाईविरोधात प्रचंड असंतोष आहे. केंद्र सरकारने ही दरवाढ तात्काळ मागे घेण्यात यावी, अशी मागणी आंदोलनातून करण्यात आली. यावेळी जिल्हा काँग्रेस सरचिटणीस सुनील सपकाळ, शहर अध्यक्ष दत्ता काकस, ॲड. राज शेख, शेख आमीन शेख बिराम, योगेश परसे, शेख मुजाहीद आदी उपस्थित होते.

Web Title: Protest against petrol, diesel price hikes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.