सरकारच्या धोरणाविरोधात खामगावात निषेध मोर्चा
By अनिल गवई | Published: October 2, 2023 07:06 PM2023-10-02T19:06:20+5:302023-10-02T19:09:40+5:30
या मोर्चाद्वारे सर्वसामान्यांना वेठीस धरणाऱ्या शासन विरोधी धोरणांचा निषेध करण्यात आला. विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
खामगाव: शासनाच्या जाचक धोरणाविरोधात सोमवारी विविध सामाजिक संघटनांच्यावतीने उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाद्वारे सर्वसामान्यांना वेठीस धरणाऱ्या शासन विरोधी धोरणांचा निषेध करण्यात आला. विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
या निवेदनात, मराठा आंदोलकांवरील हल्ल्याचा निषेध करण्यात आला. राज्यातील ६२ हजार सरकारी शाळांच्या खासगीकरणास विरोध करण्यात आला. त्याचप्रमाणे ओबीसींची जातीनिहाय जनगणना आणि संविधानिक हक्क अधिकार्यांच्या समर्थनात हा मोर्चा काढण्यात आला
भारतमुक्ती मोर्चा, बहुजन क्राती मोर्चा, राष्ट्रीय ओबीसी मोर्चा, छत्रपती क्रांती सेना, सत्यशोधक मूलनिवासी वारकरी महासंघाच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी दुपारी उप विभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात सागर मोचे, सचिन बनसोडे, ॲड. निखिल गडकर, किशोर भोसले यांच्यासह बहुजन समाजाचे शिष्टमंडळ मोठ्यासंख्येने सहभागी झाले.