मोताळा तालुका राष्ट्रवादीकडून निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:36 AM2021-05-18T04:36:13+5:302021-05-18T04:36:13+5:30
सध्या संपूर्ण देश कोरोना महामारीशी झगडत आहे. अशातच देशामध्ये पेट्रोल, डिझेल व गॅसच्या किमती बेसुमार वाढत आहेत. पेट्रोलने तर ...
सध्या संपूर्ण देश कोरोना महामारीशी झगडत आहे. अशातच देशामध्ये पेट्रोल, डिझेल व गॅसच्या किमती बेसुमार वाढत आहेत. पेट्रोलने तर शंभरी पार करून टाकली आहे. केंद्रातील भाजप सरकारने रासायनिक खतांच्या बेसुमार किमती वाढवून शेतकऱ्यांना मोठा झटका दिला आहे. केंद्र सरकारने रासायनिक खत १०:२६:२६ ची किंमत प्रति बॅग ६०० रुपयांनी तर डी. ए. पी.ची किंमत प्रती बॅग ७१५ रुपयांनी वाढवली आहे. त्यामुळे कोरोनाच्या महामारीत हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. पक्षप्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशानुसार, पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, जिल्हाध्यक्ष ॲड. नाझेर काझी यांच्या नेतृत्त्वाखाली केंद्र सरकारच्या या शेतकरी विरोधी धोरणाचा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने निषेध करण्यात आला. दरवाढ केंद्र सरकारने तातडीने रद्द करावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. यावेळी सुनील घाटे, सुनील कोल्हे, मोबीन अहमद. डॉ. शरद काळे, रामदास सपकाळ, सुधाकर सूरडकर, अविनाश वाकोडे हे हजर होते.