तलाठी भरतीच्या निकालात झालेल्या तफावती बद्दल निषेध

By अनिल गवई | Published: January 8, 2024 06:58 PM2024-01-08T18:58:05+5:302024-01-08T18:58:39+5:30

राज्य सरकार च्या विरोधात अभाविपचा आक्रोश

Protest over discrepancy in Talathi recruitment results | तलाठी भरतीच्या निकालात झालेल्या तफावती बद्दल निषेध

तलाठी भरतीच्या निकालात झालेल्या तफावती बद्दल निषेध

खामगाव: नुकत्याच झालेल्या तलाठी भरतीच्या परीक्षेचे निकाल लागलेले असून या भरतीच्या निकालामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तफावत निर्माण झाली आहे. २०० मार्काची परीक्षा असून यामध्ये विद्यार्थ्यांना २००पेक्षा जास्त मार्क देण्यात आल्याचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने तीव निषेध नोंदविण्यात आला. या विरोधात खामगाव येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर सोमवारी निदर्शने करण्यात आली.

याबाबत सविस्तर असे की, मार्काचा घोळ उघडकीस येण्यापूर्वी तलाठी परीक्षा पेपर फुटीचा सुद्धा मुद्दा पुढे आलेला होता.महाराष्ट्र सरकारने टीसीएस कंपनीच्या माध्यमातून परिक्षा घेतल्या असून या कंपनीवर कुठलाही सरकारी खात्याचे नियंत्रण नाही. ही कंपनी परीक्षा घेत असून विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात घालत आहे. सरकारने या कंपनीची सखोल चौकशी करून विद्यार्थ्यांना न्याय देण्यात यावा . तसेच परीक्षा निकालाची पद्धत ही चुकीची दिसून येते.

तसेच िनकालामुळे विद्यार्थी परिक्षेच्या निकाला मध्ये भ्रमित होत आहे. राज्य सरकारने नोकरी भरतीवर नियंत्रण ठेवावे. विद्यार्थ्यांच्या न्यायाची मागणी करीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने सोमवारी उपविभागीय कार्यालयावर निदर्शने करण्यात आली. यावेळी जिल्हा संयोजक ऋषिकेश वाघमारे, खामगाव नगर मंत्री अनिकेत वरुडकर ,शेगाव नगर मंत्री सचिन काठोळे, राहुल खरात व समस्त कार्यकर्त्यांनी आपली मागणी तहसीलदार खामगावच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी उपविभागीय अधिकारी कार्यालय परिसरात अभाविप च्या वतीने निदर्शने करण्यात आली.

Web Title: Protest over discrepancy in Talathi recruitment results

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.