सिंदखेडराजा येथे अद्ययावत कोविड सेंटर द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:32 AM2021-04-15T04:32:43+5:302021-04-15T04:32:43+5:30
तालुक्यातील असंख्य रुग्णांना जालना, औरंगाबाद या शहरांतील खासगी रुग्णालयांत जावे लागते. येथे वेळ आणि त्याहीपेक्षा पैसा मोठ्या प्रमाणावर खर्च ...
तालुक्यातील असंख्य रुग्णांना जालना, औरंगाबाद या शहरांतील खासगी रुग्णालयांत जावे लागते. येथे वेळ आणि त्याहीपेक्षा पैसा मोठ्या प्रमाणावर खर्च होतो. सध्या तर पैसा मोजूनही बेड्स उपलब्ध होत नसल्याने सिंदखेडराजा मतदारसंघातील नागरिकांची मोठी अडचण होत आहे. सध्या देऊळगाव राजा येथे एक कोविड सेंटर आहे. जिथे फारशा सुविधा नाहीत. मध्यंतरी तालुकास्तरावर कोविड सेंटर उभारण्याचा विचार सरकार स्तरावर सुरू होता. सरकारने यासंदर्भातील निर्णय लवकर घेऊन सिंदखेडराजा येथे अद्ययावत कोविड सेंटर उभारावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. यासंदर्भात पालकमंत्री नेमकी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. मात्र, गोरगरीब जनतेची हेळसांड थांबवायची असल्यास सर्व सुविधांनी युक्त असे कोविड सेंटर होणे गरजेचे आहे.