ग्रामीण रुग्णालयात सुविधा उपलब्ध करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:34 AM2021-03-17T04:34:44+5:302021-03-17T04:34:44+5:30

अशैक्षणिक कामासाठी दिली परवानगी बुलडाणा : सर्व प्रकारच्या शैक्षणिक संस्थांमध्ये अशैक्षणिक कर्मचारी, संशोधन कर्मचारी, वैज्ञानिक यांना ई-माहिती, उत्तरपत्रिका तपासणे, ...

Provide facilities in rural hospitals | ग्रामीण रुग्णालयात सुविधा उपलब्ध करा

ग्रामीण रुग्णालयात सुविधा उपलब्ध करा

googlenewsNext

अशैक्षणिक कामासाठी दिली परवानगी

बुलडाणा : सर्व प्रकारच्या शैक्षणिक संस्थांमध्ये अशैक्षणिक कर्मचारी, संशोधन कर्मचारी, वैज्ञानिक यांना ई-माहिती, उत्तरपत्रिका तपासणे, निकाल घोषित करणे आदी कामांकरिता परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे निकालाची कामे वेळेत करणे शक्य हाेणार आहे.

५० टक्के क्षमतेने वाहतुकीस परवानगी

बुलडाणा : जिल्ह्यात २३ मार्चपर्यंत लाॅकडाऊन वाढवण्यात आला असला तरी वाहतूक ही नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे. आंतरजिल्हा बस वाहतूक एकूण प्रवासी क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेसह सोशल डिस्टन्स व निर्जंतुकीकरण करून प्रवासी वाहतुकीस परवानगी देण्यात आली आहे.

काेराेनाविषयक नियमांचे पालन करावे लागणार

बुलडाणा : काेराेना संसर्ग वाढत असल्याने प्रशासनाने विविध निर्बंध लादले आहेत. चारचाकी वाहनांत चालकाव्यतिरिक्त तीन प्रवासी, तीनचाकी वाहनांत चालकाव्यतिरिक्त दोन प्रवासी व दुचाकीवर हेल्मेट व मास्क लावून दोन व्यक्तींना परवानगी देण्यात आली आहे.

सिनेमागृह संचालक आर्थिक संकटात

बुलडाणा : जिल्ह्यात काेराेना संसर्ग वाढत असल्याने २३ मार्चपर्यंत लाॅकडाऊन वाढवण्यात आला आहे. सर्व प्रकारची सिनेमागृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, मनोरंजन उद्याने, नाट्यगृहे, प्रेक्षकगृहे व इतर संबंधित ठिकाणेही बंद राहणार आहेत.

विद्यार्थ्यांना मिळाला दिलासा

बुलडाणा : विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आगामी अभ्यासिका सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. अभ्यासिका एकूण आसन क्षमतेच्या केवळ ५० टक्के क्षमतेने फिजिकल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर, मास्कचा वापर आदी नियमांचे पालन करून सुरू राहतील.

पांदण रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी

धामणगाव बढे : परिसरातील पांदण रस्त्याची गत काही दिवसांपासून दयनीय अवस्था झाली आहे. अनेक शेतकऱ्यांना आपला शेतमाल घरी आणता येत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे, राेजगार हमी याेजनेतून पांदण रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

अन्यथा मतदार यादीतून नाव कमी हाेणार

सिंदखेडराजा : ज्या मतदारांचे फोटो निवडणूक विभागाला प्राप्त झाले नाहीत, अशा मतदारांनी २५ मार्चपर्यंत आपापले फोटो संबंधित बीएलओ यांच्याकडे जमा करावेत. अन्यथा मतदार यादीतून नावे कमी करण्यात येतील, असा इशारा तहसीलदार यांनी दिला आहे.

हरभरा सोंगणीची मजुरी महागली

धामणगाव बढे : चांगला पाऊस झाल्याने परिसरात रब्बी हंगामात हरभऱ्याचा पेरा वाढला आहे. सध्या हरभऱ्याची सोंगणी सुरू झाली असल्याने शेतकरी कामात व्यस्त आहे. गतवर्षीपेक्षा सोंगणीचे दर वाढल्याने शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे.

मंगल कार्यालयांवर वाॅच

बुलडाणा : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून नगरपालिकेने शहरातील मंगल कार्यालयांना नोटीस बजावल्या आहेत. सध्या पालिकेचे पथक मंगल कार्यालयांवर नजर ठेवून आहे.

सुपर स्प्रेडरवर नजर

बुलडाणा : कोरोना संसर्गाची व्याप्ती पाहता, पालिका स्तरावर स्प्रेडरवर नजर ठेवण्यात येत आहे. सोबतच कोरोना संदिग्धाच्या तातडीने चाचण्या करण्याकडे प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे.

विटांचे भाव वाढल्याने बांधकाम रखडले

बीबी : विटांचे भाव वाढल्याने अनेकांच्या घरांचे बांधकाम रखडले आहे. वीटभट्टीमालक प्रतिट्रॅक्टर-ट्रॉली ७ हजार ५०० रुपये घेत आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांना घरकूल बांधकाम करताना महागड्या विटा विकत घ्याव्या लागत आहेत. वीटभट्टी चालू करण्याची परवानगी तहसीलदारांमार्फत देण्यात येते; पण एक ट्रॅक्टर-ट्रॉली विटांची किती हजार रुपयांत विक्री करावी, हे ठरवून दिले नसल्याने वीटभट्टीमालक मनमर्जीने दर ठरवून विटा विकत आहेत.

Web Title: Provide facilities in rural hospitals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.