गावाच्या विकासासाठी निधी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:35 AM2021-01-25T04:35:31+5:302021-01-25T04:35:31+5:30

सुलतानपूर : येथील ग्रामपंचायत विकासकामांत खूपच मागे असून विकासकामांसाठी निधी देण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्यांनी पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात केली ...

Provide funds for village development | गावाच्या विकासासाठी निधी द्या

गावाच्या विकासासाठी निधी द्या

Next

सुलतानपूर : येथील ग्रामपंचायत विकासकामांत खूपच मागे असून विकासकामांसाठी निधी देण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्यांनी पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. यावेळी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी पुढील तीन महिन्यांत तुमची मागणी पूर्णत्वास नेऊ, असा शब्द दिला.

सुलतानपूर ग्रामपंचायत लोणार तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. त्या दृष्टीने गावाचा पाहिजे तसा विकास झालेला नाही. वर्षानुवर्षांपासून अनेक समस्या कायम आहेत. त्यामुळे सुलतानपूर ग्रामपंचायतीकडे विशेष लक्ष देऊन विकासकामांसाठी निधी देण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्यांनी अन्न व औषध प्रशासनमंत्री तथा पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. सुलतानपूर येथे एका खाजगी कार्यक्रमाच्या उद्‌घाटन समारंभास डॉ. शिंगणे आले असता सुलतानपूर ग्रामपंचायतीच्या सभागृहात आयोजित सत्कार समारंभादरम्यान ही मागणी केली. या निवेदनावर सरपंच चंद्रकला अवचार, ग्रा.पं. सदस्य सै. मुक्तार सै. अली, जाकेरखान, प्रदीप सुरूशे, थोरवी पनाड, ज्योती सुरूशे, श्रीमती आशा भालेराव, लक्ष्मी सुरूशे आदींची स्वाक्षरी आहे. यावेळी उपस्थित ग्रामपंचायत सदस्यांनी पालकमंत्री डॉ. शिंगणे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. दरम्यान, माजी जि.प. सदस्य वामनराव झोरे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष सदानंद तेजनकर, पुरुषोत्तम पडघान, किशोर मापारी, पंजाबराव पनाड, अंबादास जुमडे, बंडू पडघान, भागवत रिंढे व ग्रा.पं. कर्मचारी सिद्धेश्वर सुरूशे, भिकाजी भानापुरे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

Web Title: Provide funds for village development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.