नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:36 AM2021-02-24T04:36:06+5:302021-02-24T04:36:06+5:30
साखरखेर्डा : मलकापूर पांग्रा आणि शेंदुर्जन जिल्हा परिषद सर्कल मधील गारपीटग्रस्त भागाची राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड नाझेर ...
साखरखेर्डा : मलकापूर पांग्रा आणि शेंदुर्जन जिल्हा परिषद सर्कल मधील गारपीटग्रस्त भागाची राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड नाझेर काझी यांनी पाहणी केली. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन त्यांनी नुकसान झालेल्या रब्बी तील गहू, हरभरा,कांदा,मका,ज्वारी आदी पिकांंची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिला. या नुकसानीचा पंचनामा करून शेतकऱ्यांना भरपाई द्यावी यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या दोन दिवसापूर्वी मलकापूर पांंग्रा, देऊळगाव कोळ,डोरवी,पाडळी शिंदे , झोटींगा , कंडारी , भंडारी परिसरात अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांच्या हाती आलेल्या रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. शेतकऱ्यांच्या पिकांचे झालेले नुकसान पाहून काझी यांनी
गहू, हरभरा, मका,ज्वारी आदी पिकांंसाठी हेक्टरी ५० हजार रुपये तर फळबागा, कांदा व शेड नेट साठी हेक्टरी एक लाख रुपये तातडीची मदत द्यावी अशी त्यांनी शासनाकडे मागणी केली. सिंदखेड राजा तालुक्यात सुमारे साडेचार हजार हेक्टर पेक्षा जास्त नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत मदत करावी अशी मागणी अॅडवोकेट नाझेर काझी यांनी केली. यावेळी पाहणी करताना त्यांच्यासोबत तालुकाध्यक्ष शिवाजी राजे देशमुख , विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष एड. संदीप मेहेत्रे ,पालक मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंदे यांचे स्वीय सहय्यक संभाजी पेटकर,मलकापूर पांग्रा चे सरपंच भगवानराव उगले, माजी सरपंच अहमदयारखा , आदर्श कास्तकार बंडू उगले, देऊळगाव कोळ सरपंच राजू गायकवाड, संजय गायकवाड, उद्धव गायकवाड ,डोरव्ही सरपंच बाळू पवार, उपसरपंच मुरकुट, माजी सरपंच उद्धव शेळके, वसंत मुरकुट, तुकाराम पंखुले रत्नाकर पंखुले, दिनकर सोळंके, गजानन शेळके ,प्रकाश मुरकुट, अनिल मुरकुटे, गणेश मुरकुटे, अमोल साळवे आदी उपस्थित होते.