नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:46 AM2021-02-27T04:46:54+5:302021-02-27T04:46:54+5:30
चोरपांग्रा : चोरपांग्रा, गोवर्धन नगर या भागात १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास जोरदार गारपीट झाल्याने रब्बी पिकाची प्रचंड ...
चोरपांग्रा : चोरपांग्रा, गोवर्धन नगर या भागात १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास जोरदार गारपीट झाल्याने रब्बी पिकाची प्रचंड हानी झाली होती. या परिसरात नुकसान झालेल्या पिकांची जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती पुनम राठोड यांनी पाहणी केली. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी केली.
चाेरपांग्रा परिसरात गारपीटमुळे शाळू, गहू, कांदा, हरभरा पिकाचे नुकसान झाले. सिदंखेडराजा मतदारसंघांमधील चोरपांग्रा गाव लोणार तालुक्यातील शेवटचे गाव म्हणून ओळखले जाते. त्यामुळे नुकसानाचे पंचनामेही करण्यात आले नाहीत. पुनम राठोड यांनी लोणार तहसीलदार यांच्याशी संपर्क साधून या शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे करण्यास सांगितले. यावर्षी खरीप हंगामात मूग, उडीद, कपास, सोयाबीन या पिकाचे पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. पण, या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली नव्हती. रब्बी पिकाचे नुकसान झाले असून, पंचनामा झालाच नाही. यावेळी विठ्ठल चव्हाण, अशोक डहाळके, प्रवीण महाराज, केशव डहाळके, निवृती डहाळके, एकनाथ राठोड, गणेश खंड उपस्थित हाेते.