अमडापुरात कायमस्वरूपी रुग्णवाहिका द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:42 AM2021-06-09T04:42:54+5:302021-06-09T04:42:54+5:30

अमडापूर : येथील प्राथमिक आराेग्य केंद्राला कायमस्वरूपी रुग्णवाहिका देण्याची मागणी भीम आर्मीच्या वतीने वैद्यकीय अधिकारी डाॅ. खरात यांच्या मार्फत ...

Provide permanent ambulance in Amdapur | अमडापुरात कायमस्वरूपी रुग्णवाहिका द्या

अमडापुरात कायमस्वरूपी रुग्णवाहिका द्या

Next

अमडापूर : येथील प्राथमिक आराेग्य केंद्राला कायमस्वरूपी रुग्णवाहिका देण्याची मागणी भीम आर्मीच्या वतीने वैद्यकीय अधिकारी डाॅ. खरात यांच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

गत अनेक वर्षांपासून प्राथमिक आरोग्य केंद्र अमडापूरसाठी रुग्णवाहिकेची गरज भासत आहे. अमडापूर गावाला ४० ते ४५ खेडे लागून आहेत. रुग्णवाहिकेची सोय नसल्याने अनेक रुग्णांची गैरसोय होत आहे. परिसरात काेराेनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला हाेता. अनेक रुग्णांना रुग्णवाहिका नसल्याने वेळेवर उपचार मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र अमडापूर येथे रुग्णवाहिका देण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

यावेळी भीम आर्मी जिल्हाध्यक्ष सिद्धांत वानखेडे, प्रदीप वानखेडे, जितेंद्र गवई, गजानन वानखेडे, शरद वानखेडे, संजय वानखेडे आदी उपस्थित होते.

Web Title: Provide permanent ambulance in Amdapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.