ग्रामस्थांसाठी केली पेयजलाची व्यवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:23 AM2021-06-21T04:23:07+5:302021-06-21T04:23:07+5:30
किनगावराजा : येथील सेवानिवृत्त सैनिक विलास पांडुरंग काकड यांनी सामाजिक बांधिलकीचा परिचय देत स्वतःच्या शेतातून स्वखर्चाने गावकऱ्यांकरिता पेयजलाची ...
किनगावराजा : येथील सेवानिवृत्त सैनिक विलास पांडुरंग काकड यांनी सामाजिक बांधिलकीचा परिचय देत स्वतःच्या शेतातून स्वखर्चाने गावकऱ्यांकरिता पेयजलाची व्यवस्था केली. देशसेवेतून निवृत्त होऊनही समाजसेवेकरिता घेतलेल्या पुढाकाराबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.
विलास काकड यांनी भारतीय सैन्यदलात सुमारे १८ वर्ष सेवा केली असून, लान्स हवालदार या पदापर्यंत त्यांना पदोन्नती मिळाली होती. सन २०१४ मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर सध्या महाराष्ट्र पोलीस दलात ते सेवा देत असून, सध्या ते सिंदखेडराजा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत आहेत. देशसेवेतून निवृत्त झाल्यानंतर गावापासून दूर राहिल्यामुळे समाजाची काहीतरी सेवा करावी हे बऱ्याच दिवसांपासून मनात होते. यामुळे गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची समस्या असल्याचे लक्षात आले असता स्वतःच्या शेतातून थेट ५० पाइपद्वारे पाणी आणून येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिराच्या ठिकाणी त्यांनी व्यवस्था केली.
वॉर्ड क्रमांक ४ मधील ग्रामपंचायत सदस्य प्रकाश मुंढे, संतोष काकड तसेच सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल चौरे यांनीही विलास काकड यांच्या उपक्रमास साथ देताना ११ हजार रुपये खर्च करून पाण्याच्या टाकीची तसेच नळ फिटिंगची व्यवस्था केली.