वीज विकास प्रकल्पासाठी तरतूद
By admin | Published: August 13, 2015 12:17 AM2015-08-13T00:17:19+5:302015-08-13T00:17:19+5:30
१४९ कोटी ५१ लाख मंजूर ; उच्चस्तरीय बैठकीत कृती आराखड्याचे सादरीकरण.
बुलडाणा : लोकसहभागातून विद्युत विकास ही अभिनव संकल्पना आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी मांडली होती. या संकल्पनेला वीजमंत्र्यांनी ह्यपायलट प्रोजेक्टह्ण म्हणून मान्यता दिल्यानंतर बुलडाणा विधानसभा मतदार संघातील वीज नियोजनाच्या अनुषंगाने विशेष ग्राम सभा अभियानाच्या माध्यमातून बुलडाणा विधानसभा क्षेत्रासाठी १४९ कोटी ५१ लक्ष रुपयांचा कृती आराखडा तयार करण्यात आला. या आराखड्याचे १२ ऑगस्ट रोजी राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली, तसेच उच्चपदस्थ अधिकार्यांच्या उपस्थितीत मुंबई येथे सादरीकरण करण्यात आले. या बैठकीत १४९ कोटी ५१ लाखाची तरतूद करण्यासाठी मंजुरात देण्यात आली आहे. आ. हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली लोकसहभागातून विद्युत विकास हा कल्पक पथदश्री प्रकल्प पूर्ण करण्यात आला आहे. त्यासाठी सुमारे १00 ग्रामसभांच्या माध्यमातून वीजविषयक धोरण निश्चित करण्यात आले होते. यामधून साकारण्यात आलेल्या कृती आराखड्याचा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तपशीलवार आढावा घेतला. त्यानुसार १00 के.व्ही.च्या ६९0 रोहित्रांची (डी.पी.) गरज लक्षात घेता २0८ रोहित्रांसाठी तातडीने वित्तीय तरतूद उपलब्ध करून देण्यास मंजुरी प्रदान करण्यात आली. उर्वरित वीज रोहित्रांसाठी टप्प्या-टप्प्याने वित्तीय तरतूद उपलब्ध करून देण्याचे निर्देश ऊर्जामंत्री यांनी विभागास दिले. वीज रोहित्रांसाठी आराखड्यानुसार बुलडाणा विधानसभा क्षेत्रात आगामी ५ वर्षात १0९३ डी.पी. उभारण्यात येणार असून, त्यासाठी एकूण ५५ कोटी ५७ लक्ष रुपये खर्च होणार आहे. हा उपक्रम पूर्ण झाल्यानंतर त्याची सर्व राज्यात कशाप्रकारे अंमलबजावणी करता येईल, याबाबतसुद्धा विभागाने आ.हर्षवर्धन सपकाळ यांचे मार्गदर्शन करून धोरणात्मक आखणी करण्याच्या सूचना चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या आहेत. लोकसहभागातून विद्युत विकास हा प्रकल्प राज्यातील पहिलाच प्रकल्प असल्यामुळे या प्रकल्पाच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या कृती आराखड्यामध्ये परिस्थितीसापेक्ष बदल अथवा सुधारणा तालुक्याच्या समितीचे अध्यक्ष या नात्याने आ.सपकाळ यांच्या मान्यतेने करण्याबाबतच्या सूचनासुद्धा यावेळी ऊर्जामंत्री यांनी अधिकार्यांना दिल्या आहेत. यावेळी ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव खुल्लर, वीज वितरण कंपनीचे कार्यकारी संचालक अभिजीत देशपांडे, शिंदे, बुलडाण्याचे अधीक्षक अभियंता किशोर शेगोकार उपस्थित होते.