'अंनिस'कडून सैलानी यात्रेत जादुटोणा विरोधी कायद्याबाबत जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 03:00 PM2018-03-12T15:00:34+5:302018-03-12T15:00:34+5:30
बुलडाणा : अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्यावतीने सैलानी यात्रेत जादुटोणा कायद्याविषयी प्रचार व प्रसार करण्यात आला.
बुलडाणा : अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्यावतीने सैलानी यात्रेत जादुटोणा कायद्याविषयी प्रचार व प्रसार करण्यात आला. मानसिक रोगांविषयी समाजात जनजागृती व्हावी याकरिता माहिती पञके तसेच जादुटोणा कायद्याच्या कलमांची माहिती देणारे पञक वाटले. कायद्याच्या कलमांचे बॅनर व चिञप्रदर्शनीतून प्रबोधन करण्याच्या प्रयत्न केला. सैलानीत दरवर्षी मार्च महिन्यात होळीच्या दिवसापासून मोठी याञा भरते. या याञेत बहुसंख्य मानसिक रोग्यांना घेवून त्यांचे नातेवाईक किंवा मिञ - सहकारी येताना दिसतात. तिथे येणाºया मानसिक रोग्यांचे प्रमाण पाहता - अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या कार्यकर्त्यांनी जनजागृती करण्यात आली. श्रद्धेपोटी शारीरिक मानसिक आजाराकडे दुर्लक्ष होऊन मानसिक आजार कसे बळावतात, अंगात येणे खरे की खोटे, अंगात का येते हे सांगण्याचा प्रयत्न प्रबोधनातून जनजागरनातून केला. समितीचा देवा धर्माला विरोध नसून श्रद्धेच्या नावाने होणाºया शारीरिक मानसिक आर्थिक सामाजिक लुबाडणूकीला ,फसवणूकीला विरोध आहे. मानसिक रोग्यांची पिळवणूक न होता त्यांना योग्य दिशेने उपचार मिळावेत, मानसिक रोगांची माहिती मिळावी, अंगात येणे काय असते ते कळावे म्हणून जादुटोणा कायद्याचे सैलानी यात्रेत जनजागरण करण्यात आले. अ. भा. अंनिस शाखेचे पदाधिकारी प्रतिभा भुतेकर, प्रमोद टाले, के. ओ. बावस्कर, शिवाजी पाटील, डॉ. मनोहर तुपकर, रामदास दाभाडे, भिमसेन शिराळे , आशिष गवई , गंगाराम चिंचोले, दीपाली राऊत, अस्मिता ठोंबरे, करूणा घोडेस्वार , दत्ताभाऊ सिरसाठ, प्रशांत शेकोकार, सुभाष चरवे सागर मसाल, विवेक हिवाळे इ. कार्यकर्त्यांनी जनजागृतीसाठी पुढाकार घेतला. सैलानी मुख्य दर्गा परिसर, बर्री बाबा दर्गा परिसर,झिरा परिसर,जाभंळी बाबा परिसर, मुख्य रस्ते ,चौक ,वाघजाळी परिसर, सैलानी बसस्टँड, बुलडाणा बसस्टँड , शिव मंदिर परिसर इत्यादी ठिकाणावरून जनजागरणाचे काम करण्यात आले.