सिंदखेडराजा शहरात उद्यापासून जनता कर्फ्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 12:50 PM2021-05-04T12:50:02+5:302021-05-04T12:50:18+5:30
Public curfew in Sindkhedraja city : नगरपालिकेने ५ मेपासून ११ मेपर्यंत जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे़.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदखेडराजा : शहरात गत काही दिवसांपासून काेराेनाचे रुग्ण वाढतच आहेत़ त्यात नागरिक जीवनाश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी होत आहे. त्यामुळे नगरपालिकेने ५ मेपासून ११ मेपर्यंत जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे़. यासंदर्भात सोमवारी पालिकेत बैठक झाली असून यात जनता कर्फ्यूचा निर्णय घेण्यात आला आहे.
नगराध्यक्ष सतीश तायडे व मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांनी संयुक्तरीत्या एक प्रसिद्धीपत्रक जारी केले असून यात जनता कर्फ्यूच्या संपूर्ण कालावधीत काय बंद आणि काय सुरू राहील याची माहिती देण्यात आली आहे.
केवळ आवश्यक सेवा सुरू राहणार आहेत़ जनता कर्फ्यूच्या ७ दिवसांच्या कालावधीत शहरातील दवाखाने, औषधी दुकाने, पेट्रोल पंप, गॅस एजन्सी पूर्णवेळ सुरू राहणार आहेत, तर दूध डेअरी सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे़ त्यानंतर डेअरी सुरू असणार नाही. बँक, एटीएम व विमा कार्यालय सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू असणार आहे.