बुलेट ट्रेनसंदर्भात लवकरच सार्वजनिक सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:24 AM2021-07-10T04:24:20+5:302021-07-10T04:24:20+5:30

बुलडाणा : देशातील सात प्रस्तावित बुलेट ट्रेन मार्गांपैकी एक असलेल्या मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनसंदर्भाने मध्यंतरी झालेल्या हवाई लिडार सर्वेक्षणानंतर आता ...

Public hearing on bullet train soon | बुलेट ट्रेनसंदर्भात लवकरच सार्वजनिक सुनावणी

बुलेट ट्रेनसंदर्भात लवकरच सार्वजनिक सुनावणी

Next

बुलडाणा : देशातील सात प्रस्तावित बुलेट ट्रेन मार्गांपैकी एक असलेल्या मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनसंदर्भाने मध्यंतरी झालेल्या हवाई लिडार सर्वेक्षणानंतर आता बुलडाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या बुलेट ट्रेन मार्गाच्या संदर्भाने लवकरच सार्वजनिक सुनावणी घेण्यात येणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात ही सुनावणी होणार आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयासही दोन दिवसांपूर्वीच नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनचे एक पत्र मिळाले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, लोणार आणि मेहकर या तालुक्यांतील जवळपास ५३ गावांतून या बुलेट ट्रेनचा प्रस्तावित मार्ग आहे. देशातील सात प्रस्तावित बुलेट ट्रेनच्या मार्गांपैकी मुंबई-नागपूर हा एक ७३६ किमी लांबीचा महत्त्वपूर्ण मार्ग असून प्राधान्य क्रमाने तो पूर्णत्वास नेण्याचे प्रयत्न आहेत. यासंदर्भाने मार्च महिन्यादरम्यान सर्वेक्षण करण्यात आले होते. आता या मार्गामुळे सामाजिक आणि पर्यावरणावर नेमका काय प्रभाव पडेल, हे मुद्दे घेऊन आता २२ जुलै रोजी सार्वजनिक सुनावणी घेतली जाण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. प्रकल्पाच्या पर्यावरणीय सल्लागारांनीही दोन दिवसांपूर्वी बुलडाणा जिल्ह्याचा दौरा केला केला आहे.

--अनुशेष दूर होण्यास मदत--

बुलडाणा जिल्ह्याचा दळणवळण क्षेत्राचाही अनुशेष आहे. हा प्रस्तावित बुलेट ट्रेन मार्ग पूर्णत्वास गेल्यास जिल्ह्याचा हा अनुशेष दूर होण्यास मोठी मदत मिळणार आहे. समृद्धी महामार्गाचेही काम वेगाने सुरू आहे. ते जवळपास ६५ ते ७० टक्के पूर्णत्वास गेले आहे. त्याचाही लाभ दळणवळण क्षेत्रातील अनुशेष दूर होण्यास होईल.

--भूसंपादन कायद्यानुसार बैठक--

२०१३ मध्ये करण्यात आलेल्या नवीन भूसंपादन कायद्यानुसार असे मोठे प्रोजेक्ट करताना त्याचा जिल्ह्याच्या स्थितीवर सामाजिक आणि पर्यावरणीय प्रभाव नेमका कसा राहील, तो कितपत फायदेशीर अथवा तोट्याचा राहील, हे मुद्दे घेऊन अशा पद्धतीने सार्वजनिक सुनावणी घेणे क्रमप्राप्त आहे. त्यानुषंगानेच आता ही सुनावणी होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील सूत्रांनी दिली.

--समृद्धीलगतच प्रस्तावित मार्ग--

समृद्धी महामार्गालगतच बुलेट ट्रेनचा मार्ग प्रस्तावित असून यासंदर्भात आलेल्या काही हरकती व सूचनांच्या आधारावर प्रसंगी यामध्ये बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. साधारणत: समृद्धी महामार्गालाच समांतर किमान एक किमी अंतरावरून हा मार्ग जाणार असल्याचे संकेत आहे. बुलडाणा जिल्ह्यात डोणगावनजीक २६९ प्लस २६ चेनिंगपासून ते ३५२ प्ल्स ६१ चेनिंगदरम्यान जिल्ह्यातील हा प्रस्तावित मार्ग असून बुलडाणा जिल्ह्यातील ५३ गावांजवळून तो जाईल. मात्र, प्रत्यक्षात सार्वजनिक सुनावणीनंतरच त्यातील काही बाबी स्पष्ट होतील.

Web Title: Public hearing on bullet train soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.