परीक्षार्थींसाठी उपलब्ध केली सार्वजनिक अभ्यासिका
By Admin | Published: June 2, 2017 07:13 PM2017-06-02T19:13:55+5:302017-06-02T19:13:55+5:30
चांडोळ : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी चांडोळ येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक अभ्यासिका व वाचनालय उपलब्ध करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चांडोळ : ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाच्या सुविधा उपलब्ध व्हावी, या हेतूने चांडोळ येथे येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक अभ्यासिका व वाचनालय उपलब्ध करण्यात आले आहे. तसेच या अभ्यासिकेसाठी पुस्तक उपलब्ध करण्याकरिता लोकसभगाही सरसावला आहे.
चांडोळ येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक अभ्यासिका व वाचनालयाचे उद्घाटन डॉ.मंगलमुर्ती चौधरी व डॉ.अशोक भवटे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच स्पर्धापरिक्षाद्वारे यश संपादन करणारे गावातील नवनिर्वाचीत पीएसआय प्रकाश शेळके, चंद्रकांत धनके, नंदकुमार शिंदे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सरपंच रामदास शेळके हे होते. प्रमुख पाहुणे डॉ.राजेंद्र बोराडे, गुलाबराव लवंगे, संग्राम पाटील, दिपक चाटे हे हजर होते. विशेष उपस्थिती म्हणून राजु चांदा, पंकज देशमुख, सोनुने मुख्याध्यापक, वानखेडे, देवकर, प्रकाश देशमुख, प्रेमसिंग दयावणे, संदिप टिपकरी, ज्ञानेश्वर राऊत, पंडीत भवटे, मदन जंजाळ, सागर जैयस्वाल, सुनिल चांदा, गजानन देशमुख तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी महिलांची उपस्थिती होती. या अभ्यासिकेसाठी आर्थिक सहाय्य म्हणून प्रेमसिंग दयावणे, दिपक चाटे यांनी रोख रकमेचा धनादेश दिला. शाळेतर्फे सोनुने, धाड पोलिस स्टेशन तर्फे ठाणेदार संग्राम पाटील, ग्रामपंचायतर्फे सरपंच रामदास शेळके, प्रकाश देशमुख आदींनी ज्ञानरुपी पुस्तकाची मदत देण्याचे जाहीर केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उमेश लवंगे, अनिल लवंगे यांनी केले. तर आभार प्रदर्शन अभ्यासिकेचे सदस्य सतिष भवरे यांनी केले.