३५ दुचाकी वाहनावर दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 04:23 AM2021-02-19T04:23:33+5:302021-02-19T04:23:33+5:30

३५ वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करून सहा हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. ही धडक मोहीम राबविल्याने ...

Punitive action against 35 two-wheelers | ३५ दुचाकी वाहनावर दंडात्मक कारवाई

३५ दुचाकी वाहनावर दंडात्मक कारवाई

Next

३५ वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करून सहा हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. ही धडक मोहीम राबविल्याने कागदपत्रे नसणाऱ्या वाहनधारकांमधे एकच खळबळ उडाली होती. दि. १७ फेब्रुवारी रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक चावरिया यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार अमित वानखेडे यांनी ही कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. अमडापूर परिसरात अनेक दुचाकीचोरी गेल्याच्या घटना घडत असल्याने, ही धडक मोहीम राबवून विनाकागदपत्रे नसणाऱ्या ३५ वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करून सहा हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. ही मोहीम अशीच सूरू राहणार असून, वाहनधारकांनी विनाकागदपत्रे गाडी चालू नये, असे आढळून आल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल, असे निर्देश ठाणेदार अमित वानखेडे यांनी दिले आहेत.

Web Title: Punitive action against 35 two-wheelers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.