नियमांचे उल्लंघन करयाऱ्यांवर दंडात्मक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:28 AM2021-05-03T04:28:48+5:302021-05-03T04:28:48+5:30
देऊळगाव राजा : शहरात टाळेबंदी व संचारबंदीचा आदेश झुगारून विनामास्क दुचाकीवर फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. विना ...
देऊळगाव राजा : शहरात टाळेबंदी व संचारबंदीचा आदेश झुगारून विनामास्क दुचाकीवर फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. विना मास्क १३ दुचाकीस्वार व विना परवानाधारक १४ दुचाकी चालकांकडून दंडात्मक स्वरूपात ३ हजार ७०० रुपये दंड वसूल करण्यात आला असून एका विरुद्ध टाळेबंदी आदेशाच्या उल्लंघनप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला.
तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून गत चार दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येत प्रतिदिन शंभराच्या वर भर पडत आहे. शहरात टाळेबंदी व संचारबंदीचा आदेश झुगारून सर्रास दुचाकीवर मुक्त संचार करणाऱ्या चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यामध्ये विना मास्क १३ जण, विनापरवाना १४ वाहन चालक यांच्यावर ३ हजार ७०० रुपयांचा दंड करण्यात आला तर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करून दुकान उघडे ठेवणाऱ्या एका व्यावसायिकावर गुन्हा नोंदविण्यात आला. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक मधुसूदन घुगे, उपनिरीक्षक संदीप सोनोने, एएसआय सुनील काकड, पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन जाधव, राहुल दांडगे, विजय किटे, योगेश देवकर, शहादेव धिगोडे यांच्यासह नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी केली.