विनाकारण फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:32 AM2021-05-17T04:32:56+5:302021-05-17T04:32:56+5:30
लसीकरणासाठी नाेंदणी प्रक्रिया सुलभ करा बुलडाणा : जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी ऑनलाइन नाेंदणीची प्रक्रिया क्लिष्ट असून, ती सुलभ ...
लसीकरणासाठी नाेंदणी प्रक्रिया सुलभ करा
बुलडाणा : जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी ऑनलाइन नाेंदणीची प्रक्रिया क्लिष्ट असून, ती सुलभ करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे़ नाेंदणीसाठी ग्रामीण भागात अत्याधुनिक फाेन व अन्य यंत्रणा नसल्याने लसीकरणापासून ग्रामस्थ वंचित राहत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे़
भाेसा येथे आराेग्य सर्वेक्षण सुरू
भाेसा : येथे काेराेनाचा वाढता संसर्ग पाहता माझे कुटुंब माझी जबाबदारी अंतर्गंत ग्रामस्थांचे आराेग्य सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे़ गावातील शाळेत विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आला आहे़
कडक निर्बंधांमुळे टरबूज शेतातच पडून
मेहकर : काेराेना संसर्ग वाढत असल्याने कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. भाजीपाला, फळ विक्रीही बंद असल्याने शेतकऱ्यांचा शेतमाल शेतातच पडून आहे़ आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांवर आणखी एक संकट आले आहे़
सवलत असूनही शेतकऱ्यांवर कारवाई
लाेणार : संचारबंदीमधून शेतकरीवर्गास शेतात जाण्यासाठी व येण्यासाठी सवलत देण्यात आली आहे. परंतु असे असतानादेखील शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांवर प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्त होत आहे. याबाबत प्रशासनाने शेतकऱ्यांसाठी पासेस देण्यात यावेत, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
वकिलांनाही मिळणार पेट्रोल
बुलडाणा : काेराेना संक्रमण वाढत असल्याने जिल्हाभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे़ तसेच अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना पेट्रोल देण्याचे आदेश देण्यात आले आहेत़ कोर्टाची कार्यालयीन कामे सुरू असल्याने वकिलांना पेट्रोल/डिझेल देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पाेलिसांची वाहने झाली भंगार
साेनाेशी : ग्रामीण भागात पाेलिसांना देण्यात आलेली वाहने भंगार झाली आहेत. तीन-तीन लाख किलाेमीटर धावल्यानंतरही या वाहनांची दुरुस्ती करण्यात येत नाही़. ही वाहने धावू शकत नाहीत. त्यामुळे चाेरटे किंवा गुन्हेगारांचा पाठलाग कसा करावा, असा प्रश्न पाेलिसांना पडताे. पाेलिसांच्या वाहनांची वेळाेवेळी दुरुस्ती करण्याची तसेच ग्रामीण भागात नवी वाहने देण्याची गरज आहे.
शेलसूर येथे १३२ जणांना दिली लस
चिखली : तालुक्यातील शेलसूर येथे १३२ जणांना काेराेना लस देण्यात आली़ गत काही दिवसांपासून ग्रामीण भागातही काेराेना रुग्णांची संख्या वाढतच आहे़ त्यामुळे लस घेण्याकडे ग्रामस्थांचा कल वाढला आहे़
जीवनाश्यक वस्तूंची चढ्या दराने विक्री
बुलडाणा : जिल्ह्यात वाढत्या काेराेनाचा संसर्ग पाहता कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. ग्रामीण भागात काही किराणा दुकानदार दुकाने सुरूच ठेवत असून जीवनाश्यक वस्तूंची चढ्या दराने विक्री करीत आहेत़ अशा दुकानदारांवर कारवाई करण्याची मागणी हाेत आहे़
ग्रामीण भागात पडला मास्कचा विसर
सुलतानपूर : गत काही दिवसांपासून ग्रामीण भागात काेराेना रुग्णांची संख्या वाढतच आहे़ तरीही अनेक ग्रामस्थ मास्क न लावता फिरत असल्याचे चित्र आहे़ त्यामुळे काेराेना संसर्ग वाढत असल्याचे चित्र आहे़
देऊळगाव राजात १०२ युवकांचे रक्तदान
देऊळगाव राजा : काेराेना संक्रमणामुळे देशभरात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे़ त्यामुळे शासनाने रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे़ या आवाहनाला प्रतिसाद देत देऊळगाव राजा येथे आयाेजित शिबिरात १०२ युवकांनी रक्तदान केले़
एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू
दुसरबीड : येथे काेराेनाचा उद्रेक झाला असून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे़ तीन दिवसांतच तिघांचा मृत्यू झाल्याने गावात शाेककळा पसरली आहे़ तसेच ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे़
ग्रामीण भागात पाणीटंचाई, ग्रामस्थांची भटकंती
बुलडाणा : गत काही दिवसांपासून ग्रामीण भागात पाणीटंचाई निर्माण झाली असून ग्रामस्थांची भर उन्हात भटकंती हाेत आहे़ त्यामुळे, उपाययाेजना करण्याची मागणी हाेत आहे़