मलकापूर येथे ५ लाख ३६ हजार ६६१ क्विंटल कापसाची खरेदी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 10:49 AM2020-05-24T10:49:10+5:302020-05-24T10:49:31+5:30

२०१९-२० या वर्षात एप्रिल अखेरीस ५ लाख ३६ हजार ६६१ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे.

Purchase of 5 lakh 36 thousand 661 quintals of cotton at Malkapur! | मलकापूर येथे ५ लाख ३६ हजार ६६१ क्विंटल कापसाची खरेदी!

मलकापूर येथे ५ लाख ३६ हजार ६६१ क्विंटल कापसाची खरेदी!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर: येथील बाजार समिती अखत्यारीतील सि.सी.आय.व खाजगी बाजारात सन २०१९-२० या वर्षात एप्रिल अखेरीस ५ लाख ३६ हजार ६६१ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. लॉकडाउनकाळात मे मध्ये हा आकडा वाढला असून तोंडावर आलेल्या खरिपाचा हंगामात शेतकयांसाठी ही बाब महत्त्वाची आहे.
राज्यातील सर्वात मोठ्या कापूस खरेदी व विक्री साठी मलकापूरचा नावलौकिक आहे. सर्वात जास्त जिनिंग प्रेसिंग येथे कार्यरत आहेत. त्यामुळे हि बाब अधोरेखित होते. मलकापूर परिसरात कापसाच्या उत्पन्नावर शेतकयांचा प्रामुख्याने भर आहे. नगदी पिक मानल्या जाणाया कापसावर दरवर्षी शेतकयांचा खरिपाचा हंगाम अवलंबून असतो. त्यामुळे कापसाच्या पेयावर शेतकरी भर देतात.
सन २०१९-२० या हंगामात सरासरी पेक्षा चांगला पाऊस झाला. त्यामुळे साहजिकच कापसाचे उत्पादन वाढले आहे. मात्र खाजगी बाजारात सि.सी.आयची खरेदी बंद असल्याने शेतकरी हवालदिल झाले होते.पण ती खरेदी सुरू झाल्याने शेतकयांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
मलकापूर बाजार समितीच्या अखत्यारीत सन २०१९-२० या हंगामात आजपर्यंत १ सप्टेंबर २०१९ ते ३० एप्रिल २० पर्यंत या कालावधीत २० हजार ७४९ इतक्या शेतकयांचा ५ लाख ५३ हजार ६६१ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. त्यात सी.सी.आय.अंतर्गत १५ हजार ४०७ शेतकयांचा ४ लाख ७ हजार ९५५ ,खासगी बाजारात ५ हजार ३४२ इतक्या शेतकऱ्यांचा १ लाख ४५ हजार ७४५ इतका कापूस खरेदी करण्यात आला आहे.


शेतकऱ्यांना दिलासा
लॉॅकडाउनच्या काळतही मलकापूरमध्ये ही खरेदी होत आहे. त्यामुळे गेल्या वर्षभर नैसर्गिक आपत्तीने मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांना या माध्यमातून खरिपाच्या तोंडावर आर्थिक मदत होत आहे. परिणामी खरीप हंगामातील बि-बियाणे खरेदीसाठी शेतकºयाला मदत होणार आहे.२

 

Web Title: Purchase of 5 lakh 36 thousand 661 quintals of cotton at Malkapur!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.