मध्यप्रदेशातील दरोड्यातील सोन्याची खामगाव येथील दोन व्यवसायिकांकडून खरेदी!

By अनिल गवई | Published: June 25, 2023 11:08 PM2023-06-25T23:08:39+5:302023-06-25T23:08:50+5:30

मध्य प्रदेशातील दरोड्यातील सोने खरेदी करणे खामगाव येथील दोन व्यवसायिकांच्या अंगलट आले आहे.

Purchase of gold from robbery in Madhya Pradesh from two businessmen from Khamgaon! | मध्यप्रदेशातील दरोड्यातील सोन्याची खामगाव येथील दोन व्यवसायिकांकडून खरेदी!

मध्यप्रदेशातील दरोड्यातील सोन्याची खामगाव येथील दोन व्यवसायिकांकडून खरेदी!

googlenewsNext

खामगाव- मध्य प्रदेशातील दरोड्यातील सोने खरेदी करणे खामगाव येथील दोन व्यवसायिकांच्या अंगलट आले आहे. दरोड्यातील गुन्हेगारांकडून सोने खरेदी केल्याचे निष्पन्न होताच खामगावातील एका सराफा व्यापाऱ्याला मध्यप्रदेश पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर दुसरा व्यावसायिक देवदर्शनासाठी बाहेरगावी असल्याने मध्यप्रदेश पोलीस खामगावात तळ ठोकून आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी, मध्यप्रदेशातील हरदा जिल्ह्यातील एका माजी सरपंचाच्या  घरात दरोडा टाकून बंदुकीच्या धाकावर लाखाची लूट करण्यात आली. या दरोड्यातील नऊशे ग्रॅम सोन्याची खामगाव येथील दोन व्यावसायिकांना दरोद्यातील टोळीने विक्री  केल्याचे समोर येताच प्रदेश पोलिसांनी खामगावातील दोन व्यवसायिकाच्या मुसक्या आवळल्या आहेत. यातील एका आरोपीला मध्य प्रदेश पोलिसांनी ताब्यात घेतले असून एक व्यावसायिक देवदर्शनासाठी बाहेरगावी असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दरोड्या प्रकरणी महत्त्वपूर्ण तपासासाठी देशातील पोलिसांचे एक पथक रविवारी खामगाव दाखल झाले.

खामगाव शहर पोलीस स्टेशनच्या पथकाच्या मदतीने सराफा बाजारातील जाधव आणि सोनी या व्यवसायिकाची झाडा झडती सुरू केली. यात एका व्यावसायिकाने काही सोने खरेदी केल्याचे निष्पन्न झाले. जाधव नामक सराफा व्यावसायिकाकडून काही सोने जप्त केले.  त्याला  मध्यप्रदेश पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेऊन एका हॉटेलवर ठेवले आहे. तर दुसरा व्यावसायिक हा देवदर्शनासाठी बाहेरगावी असल्याने मध्यप्रदेश पोलीस खामगावातच तळ ठोकून आहेत.

बंदुकीच्या जोरावर दांपत्याला लुटले!

मध्य प्रदेशातील हरदा जिल्ह्यातील छिपाबड पोलीस स्टेशन अंतर्गत एका माजी सरपंचाच्या येथे  बंदुकीच्या जोरावर ५० लाखाचा दरोडा टाकण्यात आला. यावेळी अवघ्या अर्ध्या तासाच्या आतमध्ये दांपत्याला बंदुकीच्या धुरावर थम करून सोने नाणे आणि रोकड लंपास करण्यात आली. या दरोड्यातील नऊशे ग्राम सोन्याची खामगावात विक्री झाल्याचे समोर येत आहे. अनुषंगाने रविवारी मध्य प्रदेश पोलिसांनी खामगाव येथील व्यावसायिकांची झाडझडती घेतली. 

या दरोड्यातील खरेदी केलेले काही सोने मध्य प्रदेश पोलिसांनी जप्त केल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. खामगाव शहरातील एका बड्या पोलीस अधिकाऱ्याने या संपूर्ण घटना क्रमाला दुजोरा दिला आहे.

Web Title: Purchase of gold from robbery in Madhya Pradesh from two businessmen from Khamgaon!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.