आरक्षित जागेचे तेरा वर्षांपूर्वीच तयार झाले खरेदीखत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 12:09 PM2021-07-15T12:09:47+5:302021-07-15T12:09:54+5:30

Khamgaon News : आरक्षित जागेवरील भूखंड घोळ तब्बल १३ वर्षे आणि त्यापेक्षा अधिक कालावधीपासून सुरू असल्याची धक्कादायक वस्तुस्थिती समोर आली आहे.

The purchase of the reserved space was made thirteen years ago! | आरक्षित जागेचे तेरा वर्षांपूर्वीच तयार झाले खरेदीखत!

आरक्षित जागेचे तेरा वर्षांपूर्वीच तयार झाले खरेदीखत!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : शहर आणि परिसरातील भूखंड घोटाळ्याला नजीकच्या काळात ब्रेक लागण्याचे अजिबात संकेत नाहीत. आरक्षित जागेवरील भूखंड घोळ तब्बल १३ वर्षे आणि त्यापेक्षा अधिक कालावधीपासून सुरू असल्याची धक्कादायक वस्तुस्थिती समोर आली आहे. या घोळाला पालिका, भूमी अभिलेख आणि संबंधित कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पाठबळ असल्याचे सिद्ध होत आहे. खामगाव शहरातील आरक्षित जागेवरील भूखंड खरेदी-विक्री प्रकरणी मध्यंतरी शिवाजी नगर पोलीस स्टेशनमध्ये नगर रचना सहाय्यक पंकज काकड यांनी तक्रार दिली. या तक्रारीची चौकशी थंडबस्त्यात असतानाच, नझूल शीट नं. ३५, प्लॉट नं. ८ वरील भूखंड घोळ उघडकीस आला आहे. या भूखंड घोळाला राजकीय पाठबळ  आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचे सहकार्य असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे गत १३ वर्षांपासून याप्रकरणी कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याची वस्तुस्थिती समोर येत आहे.
मोहता यांच्याकडून केली खरेदी! 
n भिमसिंग नवलकिशोर मोहता यांच्याकडून ही आरक्षित जागा समीर नरेंद्र संचेती, प्रमोद हसमुखराय अग्रवाल, विनय महावीरप्रसाद अग्रवाल, चंद्रकांत लक्ष्मीचंद संघवी यांनी विकत घेतली आहे. ही जागा २९ हजार ८२६ चौरस फूट म्हणजेच २७७१.९४ चौरस मीटर आहे. दरम्यान या संदर्भात संबंधित विभागाच्या आवश्यक त्या परवानग्या घेण्यात आलेल्या नाही.
 

Web Title: The purchase of the reserved space was made thirteen years ago!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.