सोयाबीनची अल्प दरात खरेदी; शेतकऱ्यांना क्विंटलमागे ८०० रूपयांचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2020 11:43 AM2020-10-11T11:43:01+5:302020-10-11T11:43:22+5:30
हमीभावापेक्षा ६०० ते ८०० रुपए कमी भाव मिळत असल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान होत आहे.
- विवेक चांदूरकर
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : बुलडाणा जिल्ह्यात सोयाबीनची अल्प दरात खरेदी होत असल्याने शेतकऱ्यांचा खर्चही वसुल होत नसल्याचे वास्तव आहे. सोयाबिनला हमीभावापेक्षा ६०० ते ८०० रुपए कमी भाव मिळत असल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान होत आहे.
जिल्ह्यात हजारो हेक्टरवर सोयाबिनची पेरणी करण्यात येते. सध्या सोयाबिनची शेतकरी विक्री करीत आहेत. काही शेतकरी गावातीलच व्यापाºयांना शेतमालाची विक्री करीत आहेत. तेथे त्यांना भाव मिळत नसून, ३ हजार ते ३२०० रुपए प्रति क्विंटल भाव मिळत आहे. तसेच कृषि उत्पन्न बाजार समितीतही सोयाबिनला हाच भाव मिळत आहे. शासनाने सोयाबिनचे हमीभाव ३८०० रुपए जाहीर केले. त्यासाठी १२ टक्के आर्द्रता असणे आवश्यक आहे. शेतकºयांना नाईलाजास्तव व्यापाºयांकडे सोयाबिनची विक्री करावी लागते. व्यापारी सोयाबिन काळे पडल्याचे किंवा प्रतवारी घसरल्याचे कारण दाखवून कमी भावात खरेदी करीत आहेत. त्यामुळे बाजार समितीत व खुल्या बाजारातही शेतकºयांना नुकसानच सहन करावे लागत आहे.
सोयाबिन बाजार समितीत विक्रीला आणले आहे. सोयाबिनच्या प्रतवारी बघून ३ हजार ते ३२०० रुपए प्रतीक्विंटल भाव मिळत आहे. सोयाबिन काढणीचा खर्च वाढला आहे. त्यामुळे शासनाने हमी भाव केंद्र त्वरीत सुरू करण्याची गरज आहे.
- प्रकाश ठाकरे, शेतकरी, अटाळी.