चिमुकल्यांना मिळणार आरओचे शुद्ध पाणी
By admin | Published: June 18, 2017 07:26 PM2017-06-18T19:26:02+5:302017-06-18T19:26:02+5:30
बोराखेडी शाळेचा उपक्रम
मोताळा: शहरालगतच्या आयएसओ मानांकन प्राप्त बोराखेडी शाळेतील विध्याथ्यार्ना शाळेच्या पहिल्या दिवसापासून शुद्ध व थंडगार आरओचे पाणी मिळणार आहे.
बोराखेडी शाळेचे उपक्रमशील मुख्याध्यापक अनिल चव्हाण यांनी सहकारी शिक्षकांसह गावकर्यांच्या मदतीने शाळा पुर्व तयारी म्हणुन उन्हाळी सुटीत आर. ओ. वाटर टँक तयार केली आहे. आर.ओ. वॉटर टँकच्या या सुविधेमुळे आता वर्षभर चिमुकल्यांना शुद्ध फिल्टरचे पाणी मिळणार आहे. शाळेमध्ये गरीब,आदिवासी व मागासवर्गीय विध्यार्थ्यांचा भरणा असून, मुख्यध्यपक चव्हाण यांनी लोकसहभाग व गावक-यांच्या मदतीने शाळेत सेमी इंग्रजी, ई लनिर्ंग चे शिक्षण, उत्तम भौतिक सुविधा, हँड वॉश स्टेशन, आर ओ वाटर, डिजीटल स्कूल आदी वेगवेगळे उपक्रम राबविले आहेत. उच्च शिक्षित शिक्षकवर्ग, लोकसभाग व गावकर्यांच्या सहकायाने शाळेला आयएसओ दर्जा मिळाला आहे. परिणामी शिक्षकांसह ग्रामवासियांचा उत्साह वाढला असून, उन्हाळी सुटीत मुख्याध्यापक चव्हाण यांनी आर.ओ. वॉटर टँक व मुलींसाठी शौचालय तयार करून घेतले आहे. शाळा सुरू होताच विद्याथ्यार्ना पिण्याच्या पाण्याची व शौचालयाची उत्तम सुविधा मिळणार आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्व मुलांना पुस्तक वाटपाची संपूर्ण तयारी झाली आहे. नगरसेवक विजय सुरडकर यांच्या कडून मुलांना लेखन साहीत्य म्हणुन वह्यांचे वाटप केले जाणार आहे. लवकरच शाळा सुरू होणार असल्याने शालेय रंगरंगोटीचे काम युद्धस्तरावर सुरू आहे.
शैक्षणिक वातावरण निर्मितीसाठी उत्तम अश्या मनमोहक निसर्गरम्य परीसरात भर पडत असून दजेर्दार शिक्षण देण्यासाठी मुख्याध्यापक अनिल चव्हाण, शाळासमिती, सरपंच सुरेश गर्दे व गावकरी यांचे विशेष योगदान लाभत आहे.