‘खारपाणपट्टय़ात शुद्ध पाणीपुरवठा करा!’
By admin | Published: April 1, 2017 02:05 AM2017-04-01T02:05:12+5:302017-04-01T02:05:12+5:30
खासदार प्रतापराव जाधव यांची लोकसभेत मागणी.
बुलडाणा, दि. ३१- खारपाणपट्टय़ाच्या क्षेत्रात राहणार्या नागरिकांना वर्षानुवर्षांंपासून क्षारयुक्त पाण्याच्या सेवनाने अनेक व्याधी होत आहेत. यात सर्वाधिक प्रमाण किडनी आजाराचे असून हजारो बळी गेले आहेत. बुलडाणा जिल्ह्यातही शेगाव, संग्रामपूर, जळगाव जामोदमध्ये २00 हून अधिक गावे प्रभावित आहेत. या क्षेत्रातील नागरिकांसाठी शुद्ध पाण्याच्या योजनेला तत्काळ पूर्ण करावे आणि डायलिसीस सेंटरसह अद्ययावत आरोग्य सुविधांसाठी डॉक्टरांची नेमणूक करावी, अशी आग्रही मागणी बुलडाणा लोकसभा मतदारसंघाचे खा. प्रतापराव जाधव यांनी लोकसभेत केली.
जिल्ह्यातील अनेक गावे क्षारयुक्त पाण्याने प्रभावित आहेत. याबाबत ह्यलोकमतह्णमध्ये २२ मार्च रोजी ह्यविंधन विहिरींचे पाणी ठरतेय जीवघेणेह्ण व २८ मार्च रोजी ह्यग्रामीण भागात अशुध्द पाणीपुरवठाह्ण या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करण्यात आले. यावृत्ताची दखल घेत दिल्ली येथे संसदेचे अधिवेशनादरम्यान खासदार प्रतापराव जाधव यांनी जिल्ह्यातील विविध प्रश्नांना वाचा फोडली. यामध्ये आज नियम ३७७ अन्वये खारपाणपट्टय़ाच्या समस्यांसंदर्भात आवाज उठवला. यामध्ये खा. जाधव यांनी जिल्ह्यातील शेगाव, संग्रामपूर व जळगाव जामोद तालुक्यात २00 हून अधिक गावांमधील नागरिक टीडीएस ५00 च्यावर ग्रेड असलेला क्षारयुक्त पाणी पितात. त्यामुळे किडनी रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यातील डायलिसीस सेंटरमध्येही अधून-मधून मशीन खराब होण्याचे प्रकार घडतात. तसेच रुग्णांना वेटिंगवर राहावे लागते. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होऊन खासगीत उपचार घ्यावे लागतात, तर अनेकांचा जीवही जातो. आतापयर्ंत हजारोंच्या संख्येने रुग्ण दगावले. सरकारने १८0 गावांसाठी शुध्द पाणी पुरवठा योजना तयार केली आहे.