पहिल्याच पावसात पूर्णा नदीला पूर

By Admin | Published: July 24, 2014 01:24 AM2014-07-24T01:24:41+5:302014-07-24T02:10:13+5:30

बुलडाणा जिल्ह्यात सर्वत्र दमदार पाऊस : जळगाव जामोद तालुक्यात सर्वाधिक पाऊस.

Purna river floods in the first rain | पहिल्याच पावसात पूर्णा नदीला पूर

पहिल्याच पावसात पूर्णा नदीला पूर

googlenewsNext

बुलडाणा : जिल्ह्यातील १३ तालुक्यातील विविध भागात काही ठिकाणी दमदार तर काही ठिकाणी रिमझिम संततधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे नदी-नाले वाहू लागले असून, सर्वात जास्त पाऊस जळगाव जामोद तालुक्यात १६५ मि.मी. झाला आहे. पहिल्याच पावसात पूर्णा नदीला पूर आल्यामुळे नांदुरा-जळगाव जामोद मार्गातील येरळीच्या पुलावरील वाहतूक बंद झाली आहे. या पावसामुळे बळी राजा सुखावला असून, काही ठिकाणी पेरणीला सुरुवात झाली आहे. पावसाळा सुरू झाला असला तरी जिल्ह्यात मागील दीड महिन्यापासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे सर्वत्र पेरण्या खोळंबल्या होत्या तर शेतकर्‍यांमध्ये चिंताग्रस्त वातावरण होते. ज्या शेतकर्‍यांकडे ठिबकची सोय होती, त्यांनी कपाशीची पेरणी करून पिकांना जगविण्याचा प्रयत्न केला; मात्र आता सर्वत्र दमदार पाऊस झाल्यामुळे उर्वरित पेरणीला सुरूवात होणार आहे. बुलडाणा तालुक्यात मंगळवारी रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली. सुरुवातीला रिमझिम पडणार्‍या पावसाने मध्यरात्रीपासून जोर पकडला होता.

*सहा गावांना सतर्कतेचा इशारा
एकाच रात्रीत जळगाव जामोद तालुक्यात १00 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, सातपुड्याच्या परिसरात तालुक्याच्या पश्‍चिमेकडील भागात मोठय़ा प्रमाणात पाऊस झाला. राजुरा धरण हे १00 टक्के भरले असून, त्याचा ओव्हर फ्लोदेखील सुरु झाला आहे. तर या धरणाच्या नदीवर असलेल्या आसलगाव, रसुलपूर, गाडेगाव खुर्द, अकोला खुर्द, सावळी आणि गोळेगाव या सहा गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, याबाबतचे पत्र संबंधित सरपंच तसेच जळगाव पोलिस स्टेशन ठाणेदार, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तथा मुख्याधिकारी यांना देण्यात आल्याची माहिती शाखा अभियंता सिंचन शाखा जळगाव जामोद कार्यालयाच्यावतीने देण्यात आली आहे; तसेच गोराळा धरणे ६0 तर धानोरा धरणात ८0 टक्के जलसाठा झाला. रात्री असा पाऊस झाल्यास दोन्ही धरणे १00 टक्के भरण्याची शक्यता आहे.

*मोताळ्यात १00 मिमी. पाऊस 

पावसाची चार नक्षत्रे कोरडी गेल्यानंतर तब्बल दीड महिन्यानंतर तालुक्यात पावासाने मंगळवारी संध्याकाळी हजेरी लावली. दोन दिवसांपासून सातत्याने रिमझिम तर मध्यम स्वरूपाचा पाऊस होत असल्याने बुधवारी सायंकाळपर्यंत तालुक्यात जवळपास १00 मि.मी.च्या आसपास पावसाची नोंद करण्यात आली. आधीच दीड महिन्याच्या उशिराने तालुक्यात दाखल झालेल्या पावसात सातत्य जरी नसले तरी मंगळवारी रात्रभर पावसाची रिपरिप सुरू असल्यामुळे सरासरीत भर पडत बुधवारी संध्याकाळपर्यंत १00 मि.मी.पर्यंत पोहोचली. महसूल प्रशासनाकडून मिळालेल्या आकडीवारीनुसार तालुक्यातील शेलापूर मंडळात ७0-मिमी, मोताळा-५८ मिमी, रोहिणखेड-४२ मिमी, धामणगाव बढे-६३ मिमी, पिंप्रीगवळी-६0 मिमी, बोराखेडी-५६ मिमी. तर सर्वात कमी पिंपळगाव देवी-१0 मिमी. पावसाची नोंद करण्यात आली.

४जिल्ह्यात एकूण ८४४.५३ मि.मी. पाऊस झाला असून, सरासरी ६४.९६ टक्के पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली. त्यात बुलडाणा तालुक्यात ५६ मि.मी., चिखली ४३, देऊळगाव राजा २६, मेहकर ५0, लोणार २९, सिंदखेड राजा २७.७, मलकापूर २८.३, मोताळा ५८, नांदुरा ७५.८, खामगाव ८0, शेगाव ६0, जळगाव जामोद १६५ व संग्रामपूर १४७ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. वृत्त लिहेपर्यंत पाऊस सुरूच होता.

Web Title: Purna river floods in the first rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.