ज्येष्ठ साहित्यिक पुरूषोत्तम बोरकर अनंतात विलीन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 02:58 PM2019-07-18T14:58:42+5:302019-07-18T14:59:04+5:30
‘मेड इन इंडिया’ या अजरामर व-हाडी कादंबरीचे लेखक तथा प्रसिध्द ज्येष्ठ साहित्यिक पुरूषोत्तम बोरकर यांच्या पार्थिवावर गुरूवारी दुपारी खामगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
खामगाव : ‘मेड इन इंडिया’ या अजरामर व-हाडी कादंबरीचे लेखक तथा प्रसिध्द ज्येष्ठ साहित्यिक पुरूषोत्तम बोरकर यांच्या पार्थिवावर गुरूवारी दुपारी खामगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे चिरंजीव मंदार यांनी आपल्या पित्याच्या पार्थीवाला भडाग्नी दिला.
‘होबासक्या’तून मराठी भाषा समृध्द करणारे साहित्यिक पुरूषोत्तम बोरकर यांचे बुधवारी रात्री ८ वाजता दरम्यान त्यांच्या सुटाळा येथील निवासस्थानी निधन झाले. त्यानंतर साहित्य आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या निवासस्थानी धाव घेतली. दरम्यान, गुरूवारी सकाळी ११ वाजता त्यांच्या अंत्ययात्रेला सुरूवात झाली. दुपारी १२ वाजता रायगड कॉलनीतील मुक्तीधाम मध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरूषोत्तम खेडेकर, मेड इन इंडियाचे सादरकर्ते तथा नाट्य कलावंत दिलीप देशपांडे, प्राचार्य पी.आर.राजपूत, त्यांचे बालपणीचे मित्र वसंत उमाळे, सुरेश बोराखडे, पुरूषोत्तम बाबर, विजय देशमुख, साहित्यिक अरविंद शिंगाडे, महादेव बगाडे, पत्रकार राजेश राजोरे, तरुणाई फांउडेशनचे सचिव राजेंद्र कोल्हे, सुभाष कोल्हे, संदीप गावंडे, प्रकाश कुटे, दा.गो.काळे यांच्यासह कवी, नाट्य कलावंत आणि साहित्य क्षेत्रातील मंडळी उपस्थित होते.