शासकीय कोविड सेंटरच्या बाहेर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे फलक लावा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:25 AM2021-06-03T04:25:02+5:302021-06-03T04:25:02+5:30
चिखली : शासकीय कोविड रुग्णालय सेंटरच्या बाहेर प्रोटोकॉलनुसार राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, तसेच आरोग्यमंत्री व पालकमंत्री यांचे फलक लावणे ...
चिखली : शासकीय कोविड रुग्णालय सेंटरच्या बाहेर प्रोटोकॉलनुसार राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, तसेच आरोग्यमंत्री व पालकमंत्री यांचे फलक लावणे अनिवार्य आहे. मात्र, चिखली व धाड येथील शासकीय कोविड सेंटरच्या बाहेर असे फलक कुठेच लावलेले नसताना, भाजप नेत्यांच्या हस्ते सदर कोविड सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. वरील दोन्ही ठिकाणी प्रोटोकॉलनुसार तत्काळ फलक लावण्यात यावे, अशी मागणी चिखली शहर काँग्रेसच्यावतीने तहसीलदार व जिल्हा चिकित्सकांकडे करण्यात आली आहे.
धाड व चिखली येथे शासकीय कोविड रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले. या ठिकाणी शासकीय प्रोटोकॉलनुसार राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, तसेच आरोग्यमंत्री व पालकमंत्री यांचे फलक लावण्यात आलेले नव्हते. तसेच उद्घाटन कार्यक्रमाला केवळ भाजप पदाधिकाऱ्यांनाच आमंत्रित केल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला आहे़ उपरोक्त दोन्ही ठिकाणी तत्काळ शासकीय प्रोटोकॉलनुसार हे कोविड सेंटर शासकीय असल्याचे दर्शविणारे फलक लावण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तथापि, आंदोलनाचा इशारादेखील देण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन देताना शहराध्यक्ष अतहरोद्यीन काझी, डॉ. अमोल लहाने, अॅड. विलास नन्हई, कैलास खराडे, अॅड. प्रशांत देशमुख, कैलास जंगले, दीपक खरात, सुनील कासारे, अकबर बागवान, आयुब जमदार, शेख शकील अहमद, मलिक जमदार, बाशिद जमदार, रमजान चैधरी, डिगांबर देशमाने, विजय जागृत, खलील बागवान, दिलीप चवरे, आदी उपस्थित होते.