शहरातून जाणाऱ्या महामार्गावर रबलींग स्ट्रीप टाका !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 05:04 AM2021-02-06T05:04:58+5:302021-02-06T05:04:58+5:30
चिखली शहरातून जाणाऱ्या खामगाव चौफुली ते मेहकर फाटा दरम्यानच्या महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या रस्त्यावर गत महिनाभरात महाबीजसमोर ...
चिखली शहरातून जाणाऱ्या खामगाव चौफुली ते मेहकर फाटा दरम्यानच्या महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या रस्त्यावर गत महिनाभरात महाबीजसमोर अनेकवेळा अपघात झाले आहेत. या अपघातांमध्ये अनेकांना जीव गमवावा लागला आहे. याच महामार्गावर हॉटेल्स, दवाखाने, आदी महत्त्वाची ठिकाणी असल्याने या ठिकाणी नियमित लग्नसमारंभ व इतर कारणांमुळे मोठी गर्दी असते. मात्र, महामार्गावरून भरधाव वाहने जात आहेत. त्यामुळे अपघातातही वाढ होत आहे. त्यात काहींना जीवही गमवावा लागल्याचा आरोप स्वाभिमानी संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. दररोजचे होणारे अपघात पाहता खामगाव चौफुली ते मेहकर फाटापर्यंत ठिकठिकाणी असलेल्या हॉटेल्स, पेट्रोलपंप, दवाखाने, शाळा, महाविद्यालये व वर्दळीचे ठिकाण पाहता ठिकठिकाणी कलर रबलींग स्ट्रीप टाकण्यात यावे, शहरातून बाहेर पडेपर्यंत वाहनांना गतीक्षमता बांधून देण्यात यावी, ज्या ठिकाणी बॅरिकेट नाहीत अशा ठिकाणी तात्काळ बॅरिकेट लावावे, बॅरिकेट लावण्यात कसूर केल्याप्रकरणी संबंधितावर मनुष्यवधाचा गुन्हे दाखल करावे, अशी मागणी निवेदनात स्वाभिमानीचे नितीन राजपूत, विनायक सरनाईक, अनिल चौहान, राम अंभोरे, सुधाकर तायडे, रविराज टाले यांनी केली असून दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
कॅप्शन : निवेदन देताना स्वाभिमानीचे राजपूत व सरनाईक.