सिंदखेडराजा नगराध्यक्षपदी काझी यांची वर्णी

By admin | Published: October 8, 2016 01:48 AM2016-10-08T01:48:56+5:302016-10-08T01:48:56+5:30

राष्ट्रवादीचे अँड.नाझेर काझी यांची सिंदखेडराजा नगराध्यक्षपदी वर्णी लागणार आहे.

Qazhi is the President of Sindh Kheda Nagar | सिंदखेडराजा नगराध्यक्षपदी काझी यांची वर्णी

सिंदखेडराजा नगराध्यक्षपदी काझी यांची वर्णी

Next

सिंदखेडराजा(जि. बुलडाणा), दि. ८- नगर अध्यक्ष पदाची निवडणूक १0 ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता होणार आहे. नगर अध्यक्षपदासाठी ४ ऑक्टोबर रोजी राकाँ जिल्हाध्यक्ष अँड.नाझेर काझी व शिवसेनेचे दिलीप आढाव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. ७ ऑक्टोबर रोजी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेचे दिलीप आढाव यांनी दुपारी ४ वाजता उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे राष्ट्रवादीचे अँड.नाझेर काझी यांची सिंदखेडराजा नगराध्यक्षपदी वर्णी लागणार आहे. सिंदखेडराजा नगर परिषदेची निवडणूक होऊन अडीच वर्ष झाले. नगर परिषदेत शिवसेनेचे ९ तर राकाँचे ७ व काँग्रेस पक्षाचा एक असे सदस्य निवडून आले होते. त्यामुळे शिवसेनेच्या नंदा विष्णू मेहेत्रे सव्वा वर्ष व गंगा दिलीप तायडे सव्वा वर्ष नगर अध्यक्षपदी विराजमान झाल्या होत्या; परंतु अवघ्या अडीच वर्षात अंतर्गत कलहामुळे शिवसेनेत फूट पडली. सध्या अडीच वर्षांनंतर न.प.अध्यक्षपद खुल्या प्रवर्गातील असल्यामुळे राकाँचे अँड.नाझेर काझी व देवीदास ठाकरे यांनी चांगली तयारी केली. त्यांनी शिवसेनेचे गटनेते सीताराम चौधरी व माजी न.प.उपाध्यक्ष चंदु साबळे यांना सोबत घेऊन पर्यटनासाठी बाहेर पडले. त्यानंतर शिवसेनेचे आणखी तिघे सदस्य फोडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य ओळखून दिलीप आढाव यांनी ७ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे राकाँचे जिल्हाध्यक्ष अँड.नाझेर काझी यांची नगर अध्यक्षपदी वर्णी लागणार आहे. १0 ऑक्टोबर रोजी अधिकृत घोषणा होईल.

Web Title: Qazhi is the President of Sindh Kheda Nagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.