अजिंठा मार्गाचा दर्जा बदलला; समस्या कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2020 03:18 PM2020-10-23T15:18:29+5:302020-10-23T15:18:42+5:30
रस्त्याचे रुंदीकरण आणि खोलीकरण निकृष्ट दजार्चे केल्या जात असल्याचे वास्तव समोर येत आहे.
- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: बुलडाणा-अंजिठा मार्गाचे बांधकाम अतिशय सुमार दजार्चे केल्या जात असल्याचे दिसून येते. परिणामी, हा रस्ता महामार्ग की सामान्य रस्ता असा प्रश्न अनेकांना पडत असून, रस्ता निर्मितीच्या सुरूवातीपासूनच राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाच्या अधिकारी कंत्राटदारावर मेहरबान असल्याची वस्तुस्थिती समोर येत आहे.
बुलडाणा-अजिंठा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला खामगाव येथून सुरूवात करण्यात आली. खामगाव-रोहणा आणि पुढे दिवठाणा फाट्यापर्यंत या रस्त्याचे दुतर्फा रूंदीकरण करण्यात येत आहे. मात्र, रस्ता कामाला सुरूवात झाल्यापासूनच रस्त्याचे रुंदीकरण आणि खोलीकरण निकृष्ट दजार्चे केल्या जात असल्याचे वास्तव समोर येत आहे. रूंदीकरण करताना एकमीटर उंची ऐवजी काही ठिकाणी अतिशय समतल जागेवरच गिट्टी टाकण्यात येत आहे. तर काही ठिकाणी मुरूमाऐवजी मातीचा वापर होत असल्याचे दिसून येते.
अंजिठा राष्ट्रीय महामार्गाच्या कामासंबधी तक्रार प्राप्त झाली आहे. या रस्त्याची पाहणी केली जाईल. रस्ताकामाकडे दुर्लक्ष आहे, असे अजिबात म्हणता येणार नाही.
-रावसाहेब झाल्टे
कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरण.