कर्मचा-यांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी
By admin | Published: April 24, 2015 01:32 AM2015-04-24T01:32:30+5:302015-04-24T01:32:30+5:30
मलकापूर नगराध्यक्षांसह पदाधिका-यांच्या पाठपुराव्याला यश.
मलकापूर (जि. बुलडाणा): मलकापूर नगर परिषदेत विविध विभागात कार्यरत असलेल्या कर्मचार्यांचे रखडलेले पगार, सेवानवृत्तांचे पेन्शन, ऊपदान व अर्जीत रजा रक्कम आदी प्रलंबित लाभ निगडीत प्रश्न विद्यमान नगराध्यक्षा सौ. मंगलाताई पाटील यांच्या कर्मचारी हिताच्या धोरणात्मक निर्णयामुळे काही प्रमाणात का होईना मार्गी लागला आहे. २२ एप्रिल रोजी नगराध्यक्षा सौ. मंगलाताई पाटील यांचेहस्ते धनादेश वितरणाला सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी काँग्रेसचे शहराध्यक्ष राजू पाटील, मुख्याधिकारी बा. रा. गुळवे, न.प. कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अनिल इंगळे, संजय मांडवेकर, किशोर तारकसे, प्रकाश मेहसरे, शंकर धामा, अभियंता यवतकार, हनुमानसिंह राजपूत आदींची प्रामुख्याने उ पस्थिती होती. न.प.मध्ये सहाय्यक वेतन अनुदान कपात सुरु झाल्याने पगार, पेन्शन, ऊपदान, अर्जीत रजा, अंशराशीकरणाचे लाभापासून या कर्मचार्यांना वंचित रहावे लागले. लाभ रोखल्यामुळे सेवेतील व सेवानवृत्त कर्मचार्यांमध्ये न.प. प्रशासनाविरुध्द तीव्र नाराजी पसरली होती.