निवडणूकीच्या धामधूमीत २२ हजार कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 04:36 PM2019-10-16T16:36:31+5:302019-10-16T16:36:42+5:30
या कर्मचाºयांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता असून सर्वच कर्मचारी वर्गाकडून नाराजी व्यक्त होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: विधानसभेसाठी २१ आॅक्टोबररोजी मतदान होत आहे. शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आॅक्टोबररचे वेतन दिवाळीपुर्वी होणार नसल्याने जिल्हयातील महसुल, नगर परिषद, कृषी आदी विभागातील सुमारे २० हजार कर्मचाºयांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे या कर्मचाºयांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता असून सर्वच कर्मचारी वर्गाकडून नाराजी व्यक्त होत आहे.
सालाबादप्रमाणे शासकीय अधिकारी आणि कर्मचाºयांना दिवाळीपुर्वीच वेतन मिळत होते. यंदाही दिवाळी आॅक्टोबर महिन्याच्या शेवटी म्हणजे २५ ला आली आहे. त्यामुळे मंत्रालयातील सचिव इंद्रजीत गोरे यांनी ९ आॅक्टोबरला पत्र काढून दिवाळीपुर्वीच अधिकारी आणि कर्मचाºयांचे वेतन देण्याचे आदेश लेखा व कोषागार विभागाला दिले होते. परंतु विधानसभा निवडणुकीचा आडोसा घेत लेखा आणि कोषागारचे उपसचिव मेनन यांनी लेखा व कोषागार विभागातील अधिकारी-कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याचे कारण समोर करत आॅक्टोबर महिन्याचे वेतन दिवाळीपुर्वी देणे शक्य नाही. त्यामुळे सर्वच अधिकारी-कर्मचाºयांचे वेतन नोव्हेंबर महिन्यातच होणार असल्याचे पत्र काढल्याने सर्वच स्तरावरील चाकरमान्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. दिवाळीपुर्वी वेतन न मिळाल्याने यंदाची दिवाळी कर्मचाºयांना कडू जाणार आहे. तर चाकरमान्यांच्या वेतनाअभावी बाजारपेठेतील गर्दीमध्येही यंदा मोठी घट होणार असल्याचे चिन्ह दिसून येत आहे. याचबरोबर दिवाळीच्या बाजारावरही याचा परिणाम दिसून येणार आहे. खामगाव येथील महसुल विभागातील सुमारे १०६ आणि नगर परिषदेतील ३९२ अधिकारी कर्मचाºयांना दिवाळीपुर्वी वेतन मिळणार नसल्याने या अधिकाºयांची दिवाळी अंधारात जाणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. (प्रतिनिधी)