शेत रस्त्यावरील पुलाचा प्रश्न लागला मार्गी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 05:05 AM2021-02-21T05:05:48+5:302021-02-21T05:05:48+5:30
कित्येक वर्षांपासून गावाजवळील नदीवरील जात असलेल्या शेत रस्त्यावर पूल नसल्यामुळे ये-जा करण्यासाठी शेतकरी त्रस्त झाले होते. त्यामध्ये शेतकऱ्यांनी वर्गणी ...
कित्येक वर्षांपासून गावाजवळील नदीवरील जात असलेल्या शेत रस्त्यावर पूल नसल्यामुळे ये-जा करण्यासाठी शेतकरी त्रस्त झाले होते. त्यामध्ये शेतकऱ्यांनी वर्गणी करूनही नदीपात्रामध्ये पुलाचे काम अपूर्णच होते. या वर्षी खूप पाऊस असल्यामुळे ते शेतरस्त्यावर पुलाची गरज निर्माण झाली. या रस्त्यावर ये-जा करण्यासाठी शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला होता. तरी ही बाब काही शेतकऱ्यांनी रमेश आण्णा मुळे यांना सांगितले असता, मुळेआण्णा यांनी कारेगाव येथे येऊन त्या स्थळाची पाहणी केली. त्या ठिकाणी पूल बांधणीसाठी १ लाख ११ हजार रुपायांचा धनादेश शेतकऱ्यांना दिला. पुलाच्या कामाला सुररवात झाली असून, पुलाचे काम अर्ध्यापेक्षा अधिक झाले आहे. या पुलामुळे ७० ते ८० शेतकरी बांधवांचा ये-जा करण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.