शेतकऱ्यांना त्वरेने पीक कर्ज देण्याच्या सुचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 05:37 PM2018-07-28T17:37:22+5:302018-07-28T17:38:52+5:30
बुलडाणा : कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांना बँकांकडून पीक कर्ज मिळण्यात दिरंगाई होत असल्याच्या पृष्टभूमीवर शेतकऱ्यांना बँकांनी तातडीने पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश वजा सुचना जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी दिल्या आहेत.
बुलडाणा : कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांना बँकांकडून पीक कर्ज मिळण्यात दिरंगाई होत असल्याच्या पृष्टभूमीवर शेतकऱ्यांना बँकांनी तातडीने पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश वजा सुचना जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी दिल्या आहेत.
जिल्ह्यात १ लाख ८५ हजार शेतकऱ्यांना ९५० कोटी रुपयांची आतापर्यंत कर्जमाफी मिळालेली आहे. अशा शेतकऱ्यांना बँकांनी त्वरेने पीक कर्ज द्यावे, त्यानुषंगाने या सुचना त्यांनी दिल्या आहेत. सोबतच पीक कर्जासाठी शेतकऱ्यांनी बँकांकडे अर्ज करावे, असेही त्यांनी अधोरेखीत केले आहे. ‘कर्जमाफीच्या याद्या ग्रामंपचायत स्तरावर, बँका उदासिन’ या आशयाचे वृत्त ‘लोकमत’ने १६ जुलै रोजी प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत जिल्हा उपनिबंधकांनी ह्या सुचना दिल्या आहेत.
कर्जमाफी पात्र शेतकरी बँकेत गेले असता त्यांची बँकेत निराशा होत असून नविन पीक कर्जासाठी सुद्धा त्यांना बँकेत खेटे घ्यावे लागत आहेत. शेतकºयांना पीक कर्जाची आवश्यकता असताना बँकामध्ये शेतकऱ्यांना वारंवार चकरा माराव्या लागत आहेत. ग्रामपंचायत स्तरावर कर्जमाफीच्या याद्या लावण्यात आलेल्या आहेत. मात्र बँकेत गेल्यानंतर बँक अधिकारी शेतकऱ्यांना कुठलीच माहिती देत नाहीत. कर्जमाफी लाभार्थी पीक कर्जापासूनही वंचीत आहेत.
दरम्यान, जिल्ह्यातील सर्व बँकांना दिलेल्या लक्षांकाप्रमाणे पात्र शेतकºयांना पीक कर्ज वाटपाची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. यापूर्वी वेळोवेळी घेण्यात येणाºया आढावा सभांमध्ये जिल्ह्यातील कर्जमाफी योजनेंतर्गत लाभ मिळालेले शेतकरी व इतर नियमित शेतकºयांकडुन कर्ज मागणी अर्ज प्राप्त होत नसल्याचा प्रकार समोर आला आहे. याकरीता महसुल व सहकार विभागाच्या संयुक्त विद्यमाने महसुल मंडळस्तरावर पीक कर्ज वाटप मेळाव्यांचे आयोजन करण्यात आलेले आहे. तसेच गावनिहाय पालक अधिकाºयांची नेमणूक करण्यात आली आहे. सर्व पात्र शेतकºयांनी त्यांच्या गावाकरीता नियुक्त पालक अधिकाºयांकडे आवश्यक त्या संपूर्ण कागदपत्रांसह पीक कर्ज मागणी अर्ज सादर करावेत, अशा सुचना जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी दिल्या आहेत.
कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या व इतर पात्र शेतकºयांनी कर्ज मागणी अर्ज तात्काळ सादर करावे. पीक कर्ज वाटपाबाबत काही अडचणी असल्यास संबंधित तालुक्याचे सहाय्यक निबंधक, सहकार अधिकारी श्रेणी-एक यांचे कार्यालयांशी तसेच जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था या कार्यालयाशी संपर्क करावा.
- नानासाहेब चव्हाण,
जिल्हा उपनिबंधक, बुलडाणा.