बुलडाणा जिल्ह्यात रब्बीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2019 03:50 PM2019-11-09T15:50:53+5:302019-11-09T15:51:26+5:30
अडीच लाख हेक्टरपर्यंत जाण्याच अंदाज प्रशासकीय सुत्रांनी व्यक्त केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या १२० टक्के पाऊस पडल्याने यंदा जिल्ह्यात रब्बीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता असून प्रसंगी ते अडीच लाख हेक्टरपर्यंत जाण्याच अंदाज प्रशासकीय सुत्रांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, विभागीय आयुक्त पियुष सिंग यांनी सात नोव्हेंबर रोजी बुलडाणा जिल्ह्यात अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जिल्ह्यातील नुकसानाचा आढावा घेतला होता. सोबतच रब्बी हंगामाच्या दृष्टीने कृषी विभागाने सज्जता ठेवावी, तथा बियाण्यांच्या उपलब्धतेच्या दृ्ष्टीनेही प्रयत्न करावे, असे स्पष्ट केले होते. त्या पृष्ठभूमीवर प्रशासकीय यंत्रणा आता रब्बी नियोजनाच्या कामालाही लागील आहे. प्रारंभी बुलडाणा जिल्ह्याचे रब्बीचे नियोजन हे एक लाख ५७ हजार १३३ हेक्टवर करण्यात आले होते. मात्र आता त्यामध्ये काहीसा बदल होण्याचे संकेतही प्रशासकीय सुत्रांनी बोलताना दिले आहेत.