विजेच्या लपंडावामुळे रब्बी हंगाम धाेक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:29 AM2020-12-24T04:29:56+5:302020-12-24T04:29:56+5:30
कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी तर कधी प्रतिकूल हवामानाचा शेतीपिकांवर परिणाम होऊन शेतकरी संकटात सापडत आहे. गेल्यावर्षी उन्हाळ्यात पाणीपातळी घटल्याने ...
कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी तर कधी प्रतिकूल हवामानाचा शेतीपिकांवर परिणाम होऊन शेतकरी संकटात सापडत आहे. गेल्यावर्षी उन्हाळ्यात पाणीपातळी घटल्याने पिके जळून गेली होती. त्यानंतर गेल्या खरीप हंगामात पिके काढणीस आली असतानाच झालेल्या अतिवृष्टीने ती वाहून गेली. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. त्यानंतर रब्बी हंगाम उभा करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागली. रब्बी पिकांची कशीबशी लागवड केली. मात्र ढगाळ हवामानामुळे कीटकनाशकांची फवारणी करीत कशीबशी पिके जगविण्याचा अटापिटा सध्या सुरू आहे. त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ होत आहे. मोठ्या प्रयत्नाने वातावरणावर मात करीत शेतकरी पिके टिकविण्याचा प्रयत्न करीत असले तरी महावितरणच्या लहरी वीजपुरवठ्यामुळे पिकांची धूळधाण होऊ पाहत आहे.
वेळोवेळी वीज खंडित होत असल्याने पिकांचे भरणे होत नाही. त्यामुळे यंदा मुबलक पाणी उपलब्ध असूनही विजेच्या लहरीपणाचा फटका शेतपिकांना बसत आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन कृषिपंपांना अखंडित वीजपुरवठा करण्याची मागणी हाेत आहे.