खरिपाच्या पीक कर्जासाठी दाखवली जाते रब्बीची वाट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 12:01 PM2020-09-29T12:01:37+5:302020-09-29T12:01:46+5:30

खरीपाचे पीक कर्ज बंद होत असल्याचे सांगूण अनेक बँका शेतकऱ्यांचे प्रस्ताव घेण्यास नकार देत आहेत.

Rabbi is shown for kharif crop loan! | खरिपाच्या पीक कर्जासाठी दाखवली जाते रब्बीची वाट!

खरिपाच्या पीक कर्जासाठी दाखवली जाते रब्बीची वाट!

Next

- ब्रह्मानंद जाधव
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: कर्जमाफीत नाव न आल्याने शेतकऱ्यांना अनेक दिवस खरीप पीक कर्जासाठी ताटकळत ठेवण्यात आले; परंतू आता नाव आल्यानंतरही शेतकरीपीक कर्जापासून वंचीत आहेत. खरीपाचे पीक कर्ज बंद होत असल्याचे सांगूण अनेक बँका शेतकऱ्यांचे प्रस्ताव घेण्यास नकार देत आहेत. खरीप पीक कर्जासाठी आलेल्या शेतकºयांना आता बँकांकडून रब्बीची वाट दाखवली जात असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
जिल्ह्यात खरीप पीक कर्जावरून सुरूवातीला मोठे रणकंदन झाले. लोकप्रतिनिधी आक्रमक झाल्याने जिल्हा प्रशासनाने जिल्हाभर पीक कर्जाचे मेळावे घेऊन पीक कर्ज वाटपाचा टक्का वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले. दरवर्षी पेक्षा यंदा पीक कर्ज वाटपाचा टक्का वाढणार असल्याचा दावा, प्रशासनाकडून करण्यात आला. त्यासाठी बँक व्यवस्थापकांची वांरवार बैठकी झाली. पीक कर्ज नाकारणाºया किंवा मुदतीमध्ये पीक कर्जाची प्रक्रिया पूर्ण न करणाºया बँक व्यवस्थापकांवर गुन्हे दाखल करण्यापर्यंत विषय गेला होता. पालकमंत्र्यांनी प्रत्येक शेतकºयांना पीक कर्ज मिळणार असल्याचे आश्वासन दिले होते. परंतू हे सर्व प्रयत्न पालथ्या घड्यावर पाणीच ठरले. खरीप हंगाम संपत आला तरी अद्यापही उद्दिष्टांच्या ५० टक्के शेतकºयांना पीक कर्जच मिळाले नसल्याचे दिसून येत आहे. पीक कर्जासाठी बँकांनी शेतकºयांना वेठीस धरल्याच्या तक्रारी वारंवार समोर आल्या आहेत. शासनाच्या कर्जमाफीत शेतकरी बसले, परंतू त्यांची नावे यादीत आली नसल्याने त्यांना बँकानी पीक कर्ज दिले नाही. जेंव्हा कर्जमाफीमध्ये नाव आले, तेंव्हा आधार प्रमाणीकरणासह अनेक कागदपत्रांसाठी शेतकºयांना पीक कर्जापासून ताटकळत ठेवण्यात आले. आता अनेक शेतकºयांच्या फाईल बँकाकंडे पडून आहेत. त्यांना खरीपा ऐवजी रब्बीचे पीक कर्ज घेण्याचा सल्ला दिला जात आहे. तर काही बँकाकडून नवीन फाईल स्विकारण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा प्रकार अनेक बँकामध्ये समोर आला आहे. तुमचे काम सप्टेंबरमध्ये होईल असे सांगून आतापर्यंत पीक कर्जासाठी प्रतीक्षेत ठेवलेल्या शेतकºयांना आता रब्बीचे पीक कर्ज घ्यावे, लागेल असे म्हणून परत पाठविले जात असल्याची माहिती शेतकºयांनी दिली.


पीक कर्ज वाटपाची अंतीम मुदत ही ३० सप्टेंबर आहेत. जिल्ह्यात ८४ टक्के पीक कर्ज वाटप पूर्ण झालेले आहे. आता उर्वरीत शेतकºयांना रब्बीचे पीक कर्ज वाटप करण्यात येणार आहे.
-नरेश हेडाऊ
जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक, बुलडाणा.

पीक कर्ज वाटपाची मुदत संपत आलेली आहे. त्यामुळे आता पीक कर्जासाठी आलेल्या शेतकºयांना रब्बीचे पीक कर्ज देण्यात येईल.
-संयोग सिंग, बँक आॅफ महाराष्ट्र, घाटबोरी.

Web Title: Rabbi is shown for kharif crop loan!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.