परतीच्या पावसामुळे रब्बीचा हंगाम प्रभावित; पेरणी लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2019 02:17 PM2019-11-11T14:17:55+5:302019-11-11T14:18:03+5:30

परतीच्या पावसामुळे खरीपाचा हंगाम हातून जाण्यासोबतच रब्बीचा हंगामही चांगलाच लांबला आहे.

Rabi season affected by return rains; Sowing is delayed | परतीच्या पावसामुळे रब्बीचा हंगाम प्रभावित; पेरणी लांबणीवर

परतीच्या पावसामुळे रब्बीचा हंगाम प्रभावित; पेरणी लांबणीवर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: गतवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच रब्बीच्या पिकांनी शेतशिवार फुलल्याचे चित्र सगळीकडे होते. यावर्षी मात्र खामगावसह परिसरात काही अपवाद सोडल्यास बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतात अद्यापही पेरणी झालेली नाही. परतीच्या पावसामुळे खरीपाचा हंगाम हातून जाण्यासोबतच रब्बीचा हंगामही चांगलाच लांबला आहे. याचा परिणाम उत्पादनावरही होण्याची शकयता आहे.
खरीपाचा हंगाम संपल्यानंतर शेतकरी रब्बीची पेरणी करतात. हरभरा, गहू, कांदा उत्पादक शेतकरीशेती मशागतीची कामे करून नियोजन करतात. परंतु यावर्षी पावसाचे प्रमाण जास्त असल्याने सुरुवातीपासूनच जमिनीत ओल कायम आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मशागत करता आली नसल्याचे दिसून येते. ज्या शेतकºयांकडे सिंचनाची व्यवस्था आहे, असे शेतकरी साधारपणे सोयाबीनची काढणी झाल्यानंतर हरभरा, गहू, कांदा पिकाचे नियोजन करतात. परंतु यावर्षी गत महिन्यापासून सतत पाऊस पडल्याने पिकांचे नुकसान तर झालेच शिवाय सोयाबीन काढणीही लांबली. गत तीन ते चार दिवसांपासून पाऊस थांबला आहे. त्यामुळे नुकसान झाल्यानंतर जे काही पिक शिल्लक आहे, अशा पिकांची काढणी शेतकरी करताना दिसून येत आहेत. दरवर्षी साधारणपणे आॅक्टोंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत ज्वारी, मका तसेच सोयाबीनची पिके घरात आलेली असतात. कपाशी तेवढीच शेतात शिल्लक राहते. परंतु यावर्षी अर्धा नोव्हेंबर महिना संपत आला तरी खरीपाची संपुर्ण पिके घरात आलेली नाहीत. ज्वारी, सोयाबीनची काढणी आता करण्यात येत आहे. साहाजिकच त्यामुळे खरीपाची काढणी लांबली. परिणामी रब्बीचे पिक घेण्यासाठी शेतात मशागत होऊ शकलेली नाही. उत्पादनाचा विचार केल्यास रब्बी हंगामातील हरभरा उत्पादनात सध्याच्या अंदाजानुसार ५ ते १० टक्के घट येण्याची शक्यता असली, तरी सध्या थंडी पाहिजे तशी पडत नसून यावर्षी थंडीचा मोसमही लांबण्याची शकयता असल्याने उत्पादन वाढूही शकते, असे कृषी तज्ञांचे म्हणने आहे. गतवर्षी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात खामगावसह नांदुरा, जळगाव जामोद, संग्रामपूर व शेगाव तालुक्यात हरभºयाचे शिवार फुलले होते. परंतु यावर्षी तसे चित्र पाहायला मिळत नाही.


कांद्याचे रोप लांबणीवर!
दरवर्षी साधारपणे मुग, उडीद निघाल्यानंतर शेतकरी कांद्याचे रोप टाकतात. परंतु यावर्षी पाऊसच एवढा पडला, की उडीदाची काढणी करणे फारच अल्प शेतकºयांना शक्य झाले. अनेकांचे पिक शेतातच सडले. पावसामुळे जमिन सतत ओली असल्याने मशागत होऊ शकली नाही. त्यामुळे कांद्याचे रोप तयार करण्याचे नियोजन लांबणीवर पडल्याचे दिसून येते.


गव्हाला फारसा फरक नाही!
यावर्षी रब्बीचा हंगाम लांबला असला, तरी गव्हाला याचा फारसा फरक पडणार नसल्याचे कृषी तज्ञ सांगत आहेत. गव्हाच्या पेरणीला अद्याप उशीर असल्याने गव्हाच्या उत्पादनावर सध्याच्या वातावरणाचा तरी काही फरक पडणार नसल्याचे दिसून येते. एकंदीरत सध्याची परिस्थिती केवळ हरभºयाच्याच उत्पादनावर परिणाम करणारी असल्याचे दिसून येते.

यावर्षी हरभºयाची पेरणी लांबली आहे. साधारणपणे १५ ते २० दिवसांनी यावर्षी उशीर झाला आहे. परंतु गहू व कांदा पिकाला याचा फारसा फरक पडणार नाही. सध्या थंडीचा मोसम नसला, तरी येणाºया काळात थंडीचा कालावधी वाढला, तर हरभºयाचेही उत्पादन समाधानकारक होऊ शकते.
-डॉ. अनिल गाभणे
कृषी तज्ञ, कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोद.


गतवर्षी आॅक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात हरभºयाची पेरणी केली होती. यावर्षी अति पावसामुळे जमिन ओली असल्याने अजुनही मशागत करता आलेली नाही. आणखी किमान आठ दिवस तरी हरभºयाची पेरणी होण्याची शक्यता नाही.
-सुधाकर सोनेकार, शेतकरी

Web Title: Rabi season affected by return rains; Sowing is delayed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.