शिवसेना-शिंदेगटात राडा; आमदार गायकवाड म्हणाले, त्यांना प्रसाद मिळाला

By निलेश जोशी | Published: September 3, 2022 05:38 PM2022-09-03T17:38:13+5:302022-09-03T17:39:09+5:30

आमचे कार्यकर्ते काही तेथे भांडणासाठी गेले नव्हते. अवाजवी बोलून तेथील व्यक्ती जर हातापायीवर आले तर आम्ही काय करणार? कार्यक्रमात जे बोलले त्यांना प्रसाद भेटला

Rada in Shiv Sena-Shinde group; MLA Gaikwad said, he got Prasad in buldhana | शिवसेना-शिंदेगटात राडा; आमदार गायकवाड म्हणाले, त्यांना प्रसाद मिळाला

शिवसेना-शिंदेगटात राडा; आमदार गायकवाड म्हणाले, त्यांना प्रसाद मिळाला

Next

बुलढाणा : येथील बाजार समितीच्या सभागृहात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या सत्कार कार्यक्रमात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी तुफान राडा ३ सप्टेंबर रोजी दुपारी केला. या संदर्भात शिंदे गटाचे आमदारसंजय गायकवाड यांना विचारणा केली असता त्या कार्यक्रमात जे बोलले त्यांना प्रसाद भेटल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. दरम्यान त्यांनी आमच्याविरोधात तक्रार केली तर आम्ही त्यांच्या विरोधात तक्रार करू. ते जेवढी नावे तक्रारीत देतील तेवढीच नावे आम्हीही तक्रारीत देऊ, असे ही ते म्हणाले. 

आमचे कार्यकर्ते काही तेथे भांडणासाठी गेले नव्हते. अवाजवी बोलून तेथील व्यक्ती जर हातापायीवर आले तर आम्ही काय करणार? कार्यक्रमात जे बोलले त्यांना प्रसाद भेटला, असा टोला आ. गायकवाड यांनी लगावला. सोबतच आम्ही कधी त्यांच्या विरोधात अपशब्द काढलेला नाही. आम्ही उद्धव ठाकरे यांचा सन्मानच केला आहे. आम्ही अपशब्द बोललेलो नाही. पण, त्यांनी मोकाटसारखे बोलले तर चालते. ते चांगले बोलले असते तर कशाला आमचे कार्यकर्ते तिकडे गेले असते. यांनी गर्दे वाचनालय सभागृह, शेगाव, मेहकर आणि चिखलीमधील मेळाव्यात काय वक्तव्य केलीत ती तपासा, असे ही गायकवाड म्हणाले. बाजार समितीमधील कार्यक्रमातही प्रमुख पाहूण्यांच्या आधी ज्या व्यक्ती बोलल्या ते आपण येथे कार्यालयात बसून ऐकत होतो, असे गायकवाड म्हणाले.

तुम्ही तुमचा पक्ष चालवा

तुम्ही तुमचा पक्ष चालवा आम्ही आडवे येत नाही. पण आमचा उल्लेख करू नये. तुमची विचारधारा काँग्रेस शिवसेनेशी असते तर ती ठेवा आमची हिंदुत्वाशी आहे. तुम्ही तुमचा पक्ष चालवा आम्ही आमचा पक्ष चालवू असेही आ. संजय गायकवाड यांनी शेवटी सांगितले.

Web Title: Rada in Shiv Sena-Shinde group; MLA Gaikwad said, he got Prasad in buldhana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.