बाल वैज्ञानिक परीक्षेत बुलडाण्याचा राघवेंद्र उबरहंडे विदर्भात प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 05:54 PM2018-11-20T17:54:10+5:302018-11-20T17:54:34+5:30
बुलडाणा: मुंबई सायन्स टिचर असोसिएशनच्या वतीने घेण्यात येणार्या डॉ. होमी भाबा बाल वैज्ञानिक परीक्षेत बुलडाण्याचा राघवेंद्र उबरहंडे हा विदर्भातून प्रथम आला आहे.
बुलडाणा: मुंबई सायन्स टिचर असोसिएशनच्या वतीने घेण्यात येणार्या डॉ. होमी भाबा बाल वैज्ञानिक परीक्षेत बुलडाण्याचा राघवेंद्र उबरहंडे हा विदर्भातून प्रथम आला आहे. गेल्या ३४ वर्षापासून ही परीक्षा घेण्यात येत असून १९८४ मध्ये या परीक्षेची सुरूवात झालेली आहे. डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षा म्हणून ती राज्यात ओळखली जाते. प्रामुख्याने सहावी आणि नऊ वीच्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा घेण्यात येत असते. गेल्या वर्षी या परीक्षेसाठी राज्यातील जवळपास ५८ हजार विद्यार्थी बसले होते. दरम्यान, बुलडाणा येथून संडे सायन्स सेंटरचे सहाव्या वर्गातील ११ आणि ९ व्या वर्गातील चार विद्यार्थी या परीक्षेसाठीच्या प्रात्याक्षीक परीक्षेसाठी पात्र ठरले होते. यापूर्वी ऐवढ्या मोठया प्रमाणावर येथील विद्यार्थी कधी पात्र ठरले नव्हते. सहाव्या वर्गासाठी यावर्षी ६६ गुणांचा कटआॅफ होता तर ९ व्या वर्गा साठी ५४ गुणांचा कट आॅफ होता. राघवेंद्र उबरहंडे हा सहाव्या वर्गाचा विद्यार्थी आहे. दरम्यान, ९ व्या वर्गातून बुलडाण्याच्या शारदा कॉन्व्हेंटची श्रेया पिंगळे हीने उत्तम कामगिरी केली आहे. परीक्षेची काठिण्य पातळी दर्जेदार १९८४ पासून घेण्यात येणार्या या परीक्षेची काठिण्य पातळीही दर्जेदार असून थेरी, प्रॅक्टीकल, थिसीस आणि प्रत्यक्ष प्रेझेंटेशन अशा पातळ््यातून या बाल वैज्ञानिकांना जावे लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा यात चांगलाच कस लागतो, अशी माहिती बुलडाणा येथील संडे सायन्स सेंटरच्या राजमती ठेंग यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. दरम्यान, दिवसेंदिवस या परीक्षेला बसणार्या विद्यार्थ्यांची संख्या सातत्याने वाढत असल्याचेही त्या म्हणाल्या.