दारूबंदीसाठी राहुल बोंद्रे यांचा आक्रमक पवित्रा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 01:18 AM2018-03-29T01:18:07+5:302018-03-29T01:37:01+5:30

चिखली : कोणत्याही गावात दारूबंदी लागू करण्यासाठी पार पडणाºया मतदान प्रक्रियेत बदल करण्यात येऊन ही मतदान प्रक्रिया महसूल विभागामार्फत घेण्यात यावी, मागणीसाठी विधानसभेत आमदार राहुल बोंद्रें यांनी आक्रमक पवित्रा घेत विधानसभा अध्यक्षांसमोरील विंगमध्ये उतरल्याने याबाबत तातडीने निर्णय घेण्याची भूमिका सरकारने स्पष्ट केली आहे.

Rahul Bondre's aggressive for ban drinking! | दारूबंदीसाठी राहुल बोंद्रे यांचा आक्रमक पवित्रा!

दारूबंदीसाठी राहुल बोंद्रे यांचा आक्रमक पवित्रा!

Next
ठळक मुद्देदारूबंदीसाठीची मतदान प्रक्रि येतील बदलासाठी विंगमध्ये उतरले

लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : कोणत्याही गावात दारूबंदी लागू करण्यासाठी पार पडणाºया मतदान प्रक्रियेत बदल करण्यात येऊन ही मतदान प्रक्रिया महसूल विभागामार्फत घेण्यात यावी, मागणीसाठी विधानसभेत आमदार राहुल बोंद्रें यांनी आक्रमक पवित्रा घेत विधानसभा अध्यक्षांसमोरील विंगमध्ये उतरल्याने याबाबत तातडीने निर्णय घेण्याची भूमिका सरकारने स्पष्ट केली आहे.
विधानसभेच्या कामकाजादरम्यान दारूबंदीबाबत आमदार डॉ.अनिल बोडे यांनी लक्षवेधी दाखल केली होती़  या चर्चेत सहभागी होताना देशी दारूचे दुकान हटविण्यासाठी गावातील एकंदरीत महिलांचे ५० टक्के मतदान दारूबंदीच्या बाजूने व्हावे लागते़  तरच दारू दुकान हटविण्याचा निर्णय घेतला जातो; मात्र ही अटच मुळात लोकशाहीविरोधी असून, दारूबंदीसाठी झगडणाºया महिलांची गळचेपी करणारी आहे़  तसेच दारूचे दुकान हटविण्यासाठी होणारी मतदान प्रक्रिया राज्य उत्पादन शुल्क या विभागाकडून होते. त्यांच्याकडून ही प्रक्रिया काढून घेत ती महसूल विभागावर सोपविण्यात यावी, अशी आग्रही मागणी आमदार राहुल बोंद्रे यांनी आज सभागृहात आक्रमकपणे लावून धरली़  दरम्यान, दारूच्या दुकानासाठी ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेच्या परवानगीची आवश्यकता नसल्याचे रद्द करावे व इतर मागण्यांबाबत राज्य उत्पादन शुल्क मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उत्तराने समाधान न झाल्याने आ.बोंद्रे अध्यक्षांच्या समोरील मोकळ्या जागेत धाव घेऊन तेथे त्यांनी जोरदार निषेध व्यक्त केला.़ त्यामुळे येत्या तीन महिन्यांत सदर निर्णय बदलण्यासंदर्भात घोषणा करण्याचे आश्वासन ना. बावनकुळे यांनी दिले आहे. 

अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याची पुनर्स्थापना करा!
तालुक्यातील इसरूळ येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा व त्यांचे श्रद्धास्थान असलेले भांगिर बाबाचे मंदिर हटविण्याच्या कार्यवाहीची न्यायालयीन चौकशी व्हावी व या प्रकरणात दाखल झालेले खोटे गुन्हे मागे घेण्यात येऊन पुतळा त्याच जागेवर बसविण्यात यावा, अशी मागणी आमदार राहुल बोंद्रे व आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी सामाजिक न्यायमंत्री ना. राजकुमार बडोले यांची प्रत्यक्ष भेट घेऊन केली आहे़ 

शहर पाणी पुरवठा योजनेबाबत लवकरच बैठक 
चिखली शहरासाठी नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यासाठी याबाबत तातडीने बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावावा, अशी आग्रही भूमिका विधानसभेत आ. राहुल बोंदे्र यांनी मांडली असता पाणी पुरवठा राज्यमंत्री ना. रणजित पाटील यांनी तातडीने बैठक लावून प्रश्न मार्गी लावण्याचे सभागृहात जाहीर केले आहे.
 

Web Title: Rahul Bondre's aggressive for ban drinking!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.