किनगाव राजातील कृषी केंद्रावर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:23 AM2021-06-21T04:23:04+5:302021-06-21T04:23:04+5:30
यासंदर्भात सिंदखेड राजा पंचायत समितीचे कृषी अधिकारी के.एस. ठोंबरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई २० जून रोजी केली. सिंदखेड ...
यासंदर्भात सिंदखेड राजा पंचायत समितीचे कृषी अधिकारी के.एस. ठोंबरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई २० जून रोजी केली. सिंदखेड राजा - मेहकर मार्गावर एमएच-१२ एचडी-४११२ क्रमांकाच्या वाहनात सोयाबीनचे बियाणे किनगाव जट्टू येथील शेतकरी विठ्ठलदास दायमा यांना कच्च्या पावतीवर जादा दराने विक्री होत असल्याचे निदर्शनास आले. यासंदर्भात संबंधितास विचारणा केली असता ते तेथून निघून गेले. दरम्यान, तपासणीमध्ये कृषी अधिकाऱ्यांना संबंधित वाहनातील बियाणे हे विलास कृषी केंद्राचे संचालक ज्ञानेश्वर किसन नागरे यांचे असल्याचे समोर आले. पंचनाम्यातही ही बाब नमूद आहे. त्या अनुषंगाने तेथे कृषी अधिकारी जी.डी. सावंत, जी.आर. झोरे, एस.पी. घुगे यांनी संबंधित दुकानात पाहणी केली.
----
कृषी केंद्राची तपासणी केली असता अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. याबाबतचा अहवाल वरिष्ठ कृषी अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येणार आहे.
-के.एस. ठोंबरे,
कृषी अधिकारी, सिंदखेड राजा