जवळा येथे जुगारावर छापा; २६ जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 12:26 PM2018-10-20T12:26:55+5:302018-10-20T12:27:43+5:30
लोकमत न्युज नेटवर्क शेगाव - उपविभागिय पोलीस अधिकारी प्रदिप पाटील यांचे पथक व पो.स्टे. शेगांव ग्रामिण पोलीसांनी संयुक्तिक कारवाईत ...
लोकमत न्युज नेटवर्क
शेगाव - उपविभागिय पोलीस अधिकारी प्रदिप पाटील यांचे पथक व पो.स्टे. शेगांव ग्रामिण पोलीसांनी संयुक्तिक कारवाईत जवळा बु येथे छापा टाकून 1लाख 22 हजारांच्या मुद्देमालासह 26 जणांना अटक करण्यात आली. ही कारवाई 19 ऑक्टोबर रोजी रात्री 11 वाजेदरम्यान सुरू होवून 20 ऑक्टोबर रोजी पहाटे 5 वाजता ग्रामीण पो.स्टे मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील जवळा बु येथील राजुबापू देशमुख यांच्या खळ्यात रात्री उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाने छापा टाकला. यात एक्का बादशहा नावाचा जुगार खेळताना 26 जणांना रंगेहात पकडले.यात भागवत ऊर्फ मनिष गणेश जवळकार वय ३२ वर्षे रा. जवळा बु , दिनकर शालीग्राम
राऊत वय ४९ वर्ष रा.जवळा . देवीदास रमेश भटकरवय ३३ वर्ष,रा.जवळा बु, शेख शफी शेख रफीक वय ४० वर्ष,रा.जवळा बु. रमेश तोताराम हिंगणे,वय ५६ वर्ष, रा. वरखेड बु. प्रशांत पांडुरंग वासनकारवय ३२ वर्ष,रा.जवळा महागाव. सचिन सुरेश उन्हाळेवय २७ वर्ष, रा. जवळा पळसखेड, अक्षय प्रभाकर देशमुखवय १९ वर्ष, रा. जवळा बु., महादेव श्रीकृष्ण कान्हेरकर, वय २४ वर्ष,रा.जवळा बु. मनोज गजानन काळे वय २२ वर्ष,रा.जवळा पळसखेड सहदेव त्रंबक खोंड, वय २५ वर्ष,रा.जवळा पळसखेड, दिपक बलदेव देठेवय ३० वर्षराजवळा पळसखेड, प्रथमेश कृष्णराव क-हाळे, वय २१वर्ष, रा.जवळा बु. संतोष देवलाल कान्हेरकर वय २८ वर्ष,रा.जवळा बु. शिवदास नारायण कळसकार वय ३५ वर्ष, रा.जवळा पळसखेड , अक्षय श्रीधर कान्हेरकर, वय २० वर्ष,रा.जव बु. निलश गोपाल कान्हेरकर, वय ३२ वर्ष, रा.जवळा बु. गजानन नारायण कोल्हे, य ४९ वर्ष, रा. जवळा महागाव , दिपक प्रकाश कान्हेरकर, वय २० वर्ष, रा. जवळा बु. , शरीफ शहा लडवु शहा ,वय ३९ वर्ष,रा.जवळा बु. . प्रल्हाद नारायण कोल्हेवय ५२ वर्ष,रा.जवळा महागाव . अजय नधुकर खोंड,वय वर्ष, रा. जवळा पळसखेड . विनोद रामदास उन्हाळेवय ३० वर्ष, रा. जवळा पळसखेड . संतोष श्रीराम डिघोळे,वय ३२ वर्ष,रा.जवळा पळसखेड . आशिष मनोहर भटकरवय २१ वर्ष, रा.जवळा यु. . ऋषीकेश पाङरग भटकरवय २३ वष,रा.जवळा बु. यांना पोलीसांनी अटक केली आहे. छाप्यात एकुण १,२२,३२० रु. चा मुद्देमाल मिळून आला.
अपर पोलीस अधिक श्याम घुगे खामगांव, उपविभागिय पोलीस अधिकारी प्रदिप पाटील यांचे आदेशाने व मार्गदर्शनाखाली यातील नमुद आरोपीवर पंचासमक्ष छापा टाकला असता नमुद आरोपी हे तासपत्त्यावर पैशाचे हारजितवर एक्का बादशहा नावाचा जुगार खेळतांना मिळून आले. याबाबत पो.ना. सुधाकर प्रभाकर थोरात वय ३३ वर्षे, उपविपोअ. पथक यांनी फिर्याद दिली.
सदरची कार्यवाही एस.डी.पी.ओ.सा.खामगांव यांचे पथकातील पो.स्टे. शेगांव ग्रामिण चे ठाणेदार सपोनि. गोकुल सूर्यवंशी,पथकातील कर्मचारी पो.ना. सुधाकर थोरात, पो.ना. प्रदिप मोठे, देवेंद्र शेळके, स.क. गवारगुरु, कन्नर,तारुळेकर, पो.स्टे. शेगांव ग्रामिण चे कर्मचारी पोहेकॉ. धांडे, पो.. लासुरकर यांनी केली. (शहर प्रतिनिधी)