जुगारावर धाड, सहा जणांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:20 AM2021-07-24T04:20:42+5:302021-07-24T04:20:42+5:30

सुंदखेड येथे अवैध दारु जप्त बुलडाणा : संदरखेड जुनागाव येथे दारुची अवैध विक्री करीत असलेल्या महिलेवर बुलडाणा शहर पाेलिसांनी ...

Raid on gambling, action against six people | जुगारावर धाड, सहा जणांवर कारवाई

जुगारावर धाड, सहा जणांवर कारवाई

Next

सुंदखेड येथे अवैध दारु जप्त

बुलडाणा : संदरखेड जुनागाव येथे दारुची अवैध विक्री करीत असलेल्या महिलेवर बुलडाणा शहर पाेलिसांनी २२ जुलै राेजी कारवाई केली. या महिलेकडून २,११० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे़ पुढील तपास पाेलीस करीत आहेत़

मजुरीचे पैसे मागितल्याने मारहाण

बुलडाणा : मजुरीचे पैसे मागितल्याने एकाने काठीने मारहाण केल्याची घटना मढ शिवारात २२ जुलै राेजी घडली. याप्रकरणी रतन हिरालाल पारसे यांच्या फिर्यादीवरून धाड पाेलिसांनी आराेपी रंजीत पुन्नीलाल चांदा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़

शेतीच्या वादातून मारहाण

मेहकर : शेतीच्या वादातून अंजनी येथील विष्णू तुकाराम ढसाळ यांना आकाश बद्री ढसाळ, प्रकाश बद्री ढसाळ व बद्री ढसाळ यांनी काठ्यांनी मारहाण केली़ याप्रकरणी आराेपींविरुद्ध मेहकर पाेलिसांनी २२ जुलै राेजी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे़

दुचाकी लंपास, गुन्हा दाखल

जानेफळ : पाेलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कळमेश्वर येथील गाेठ्यासमाेर उभी केलेली दुचाकी अज्ञात चाेरट्यांनी लंपास केल्याची घटना २२ जुलै राेजी उघडकीस आली़ याप्रकरणी वैभव रामेश्वर निकम यांच्या फिर्यादीवरून पाेलिसांनी अज्ञात चाेरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

भुईमुगासह ३८ हजारांचा ऐवज लंपास

लाेणार : लाेणार ते लाेणी रस्त्याच्या बाजूला असलेल्या पिंपळनेर शिवारातून अज्ञात चाेरट्यांनी २८ पाेते भुईमुगाची शेंग किंमत ३५ हजार, ज्वारीच्या तीन थैल्या किंमत १५०० रुपये व इतर साहित्य असा ३८ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला़ याप्रकरणी यादव दौलतराव सानप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाेलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़

खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता

डाेणगाव : येथील बसस्थानक परिसरात गत काही दिवसांपासून माेठमाेठे खड्डे पडले आहेत़ त्यामुळे, अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे़ या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचलेले असल्याने वाहन चालकांना अंदाज येत नसल्याचे चित्र आहे़

Web Title: Raid on gambling, action against six people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.