निमगाव वायाळ येथे जुगार अड्ड्यावर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:36 AM2021-09-03T04:36:06+5:302021-09-03T04:36:06+5:30
-- सर्दी, खोकला, तापाने ग्रामीण भाग फणफणला जानेफळ : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना नागरिकांना दिलासा मिळेल असे वाटले ...
--
सर्दी, खोकला, तापाने ग्रामीण भाग फणफणला
जानेफळ : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना नागरिकांना दिलासा मिळेल असे वाटले होते. मात्र, सध्या पावसाळ्याचे दिवस असून, अनेक गावांमध्ये स्वच्छतेचा अभाव आहे. त्यामुळे जानेफळसह परिसरातील ग्रामीण भागामध्ये सर्दी, खोकला, ताप यासह विविध आजाराने लहान मुलांसह मोठ्यांना ग्रासले असून त्यामुळे खासगी रुग्णालये हाऊसफुल झाले आहेत.
नाल्या सफाईची मागणी
बुलडाणा : मागील काही दिवसांपासून बुलडाणा शहर आणि परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. अशातच शहरातील काही भागात नाल्यांची सफाई न झाल्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावरून चिखल साचला आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे.
पुलांची उंची वाढविण्याची मागणी
मेहकर : मेहकर तालुक्यातील वडाळी ते पारखेड फाटा या रस्त्यावर असलेल्या तीन ते चार पुलांची उंची अगदीच कमी असल्याने या पुलावरून पावसाळ्याच्या दिवसांत पुलावरून पाणी जाते. यामुळे काही दिवस पाणी ओसरेपर्यंत वाहतुकीचा खोळंबा होतो. तेव्हा अशा पुलांचे सर्वेक्षण करून पुलांची उंची वाढवावी, अशी मागणी केली जात आहे.