वरवंड येथे जुगारावर धाड; पाच जणांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:36 AM2021-05-27T04:36:25+5:302021-05-27T04:36:25+5:30
बुलडाणा : तालुक्यातील वरवंड येथील शेतशिवारामध्ये सुरू असलेल्या जुगारावर बुलडाणा ग्रामीण पाेलिसांनी २६ मे राेजी धाड टाकून पाच जणांवर ...
बुलडाणा : तालुक्यातील वरवंड येथील शेतशिवारामध्ये सुरू असलेल्या जुगारावर बुलडाणा ग्रामीण पाेलिसांनी २६ मे राेजी धाड टाकून पाच जणांवर कारवाई केली, तसेच त्यांच्याकडून ७ लाख ६३ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला.
वरवंड येथील शेतशिवारात जुगार सुरू असल्याची माहिती बुलडाणा ग्रामीण पाेलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक सारंग नवलकार यांनी सहकाऱ्यांसह धाड टाकली. यावेळी रंगनाथ गोपाळा काकडे, रा. भादाेला वाडी, संजय मारोती खारे, शिवाजी कुंडलिक चव्हाण , करीम शहा मुसा शहा व विठ्ठल हिंमतराव जेऊघाले यांच्यावर कारवाई केली. त्यांच्याकडून राेख २६ हजार, एक कार किंमत पाच लाख रुपये, चार दुचाकी किंमत १६ हजार ५०० रुपये, पाच माेबाइल किंमत ७२ हजार व जुगाराचे साहित्य असा ७ लाख ६३ हजार ४० रुपयांचा ऐवज जप्त केला़. यावेळी अरुण सुधाकर शेळके, रा. वरवंड व गजानन प्रल्हाद भालेराव, रा. माळविहीर हे दोघे घटनास्थळावरून पळून गेले. ही कारवाई ठाणेदार पोलीस निरीक्षक सारंग नवलकार, एएसआय मोहन राठोड, हेकाॅ शेळके, एनसीपी दिलीप बोरसे, दीपक डोळे, दुर्गासिंग ठाकूर, चालक संजय ठोंबरे यांनी केली.